X

Ayushman Card : आयुष्मान कार्डवर मोफत उपचार देण्यास नकार दिल्यास, हा नंबर करा डायल

Ayushman Card

Ayushman Card : सरकार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना रुग्णालयात मोफत उपचार देत आहे. यासाठी त्यांनी या योजनेत समाविष्ट असलेल्या लोकांसाठी एक कार्ड बनवलेले आहे. या कार्डला आयुष्यमान कार्ड असे म्हणतात. या कार्डच्या मदतीने तुम्ही सरकारी त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकता. या योजनेअंतर्गत अनेक हॉस्पिटल नोंदणीकृत झालेली आहे. त्यामुळे आता या योजनेच्या पॅनलमध्ये समाविष्ट झालेले नागरिक कोणत्याही रुग्णालयात उपचार घेऊन शकतात.

अनेकवेळा आयुष्मान योजनेच्या पॅनलमध्ये समाविष्ट झालेले रुग्णालय आयुष्मान कार्डधारक असलेल्या व्यक्तीला उपचार देण्यास नकार देतात. त्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात. परंतु आता या पॅनलमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालय या योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांवर या कार्डद्वारे उपचार देण्यास नकार करू शकत नाही. लोकांमध्ये माहितीच्या अभावामुळे काही रुग्णालय उपचार देण्यास नकार देतात. परंतु याबाबत पूर्ण माहीत नसल्यामुळे लोकही याबाबत तक्रार देत नाहीत.
टोल फ्री नंबर
>>>येथे क्लिक करा <<<

This post was last modified on June 18, 2024 1:33 pm

Tags: E Shram Card
Davandi: