
ATM WITHDROWL MONEY |
ATM WITHDROWL MONEY : आरबीआयच्या एका निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे. नवे नियम लवकरच लागू होणार आहेत.
नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचें शुल्क 17 रुपयांवरुन 19 रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा बदल 1 मे 2025 पासून लागू होणार आहेत. देशांतर्गत वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे.
एनपीसीआयनं 13 मार्चला जारी केलेल्या पत्रकानुसार गैर वित्तीय व्यवहारांसाठी 7 रुपयांचं इंटरचेंज शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय इंटरचेंज शुल्काव्यतिरिक्त जीएसटी शुल्क देखील आकारलं जाणार आहे.
ATM WITHDROWL MONEY : एनपीसीआयनं यासंदर्भातील बदल लागू करण्यासाठी आरबीआयकडे मंजुरी मागितली होती. या संबंधात आरबीआयनं 11 मार्च 2025 ला लिहिलेल्या पत्रात एनपीसीआयला सूचना देण्यात आली होती. त्यामध्ये एटीएम इंटरचेंज शुल्क एटीएम नेटवर्क द्वारे निश्चित केल जाऊ शकतं, असं सांगण्यात आलं. याशिवाय नव्यानं निश्चित करण्यात आलेलं शुल्क लागू करण्यात येण्यासंदर्भातील तारीख आरबीआयला एनपीसीआयनं कळवावी, असं सांगण्यात आलं आहे.
आरबीआयच्या एका निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे
हे ही वाचा : आज बीड न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी