ATM मधून पैसे काढण्यासाठी SBI चा नवीन नियम; अन्यथा…..

एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी नमूद करावा लागणार.

ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने या नव्या नियमांबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.

ग्राहकाला १० हजारांहून अधिक रक्कम एटीएममधून काढायची असल्यास त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.

ओटीपी आणि पीन क्रमांक नमूद करावा लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला एटीएममधून पैसे काढता येणार आहे.

तुम्ही जर विना मोबाइल एटीएममधून पैसे काढायला गेल्यास तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. कारण एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला मोबाइल नंबरवर येणारा ओटीपी टाकावा लागेल.

एसबीएय एटीएममधून पैसे काढताना ओटीपी टाकल्याशिवाय कॅश निघणार नाही. एटीएममधून पैसे काढताना तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

भारतीय स्टेट बँकने (SBI) सोशल मीडिया साइट ट्विटरवर एक ट्विट करत माहिती दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, ओटीपी आधारित कॅश विड्रॉल सिस्टम एसबीआय एटीएमवर होणारी फसवणूक रोखण्यासाठी उचललेले पाऊल आहे.

tc
x