आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धांतील लढतीची पर्वणी पुन्हा चाहत्यांना अनुभवाला मिळणार आहे. हे दोन संघ आज ( १० सप्टेंबर ) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीत आमनेसामने येणार आहेत. काही वेळात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ कोलंबोत भिडणार आहेत. तेव्हा, कोलंबोतील हवामान कसं असणार? पाऊस पडणार का? हे सर्व प्रश्न सर्वांना पडले आहेत.
😱 झोप उडवणारी बातमी ‼️🤔
सविस्तर जाणून घ्या 👇👇
https://davandi.in/2023/01/30/sarpanch-deputy-sarpanch-gram-sevak-villager-read-if-you-read/
कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. गटफेरीतील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. यानंतर आज पुन्हा दोन्ही संघ भिडणार आहेत.
हवामान खात्याने आठवड्याच्या शेवटी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी कोलंबोत पाऊस झाला नाही. शनिवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडला.
आजच्या सामन्यात पाऊस पडला, तर उद्या ( ११ सप्टेंबर, सोमवार ) राखीव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास सामना राखीव दिवशी खेळवला जाईल, असे एसीसीने स्पष्ट केलं आहे. सामना ज्या स्थितीत पावसामुळे थांबेल, तिथूनच पुढे सुरू होईल.
✅ Visit on: https://davandi.in/2023/01/06/आपली-जाहिरात-आपला-ब्रँड-प/
भारताच्या आघाडीच्या फळीची पुन्हा कसोटी
कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांची पुन्हा पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ या वेगवान गोलंदाजांसमोर कसोटी लागणार आहे. साखळी फेरीतील उभय संघांच्या सामन्यात शाहीनने रोहित आणि कोहली यांना बाद केले होते. डावाच्या सुरुवातीला रोहितचे पदलालित्य तितकेसे आश्वासक नसते आणि याच वेळी शाहीनचा सामना करताना तो अडचणीत सापडतो. साखळी सामन्यात दोन बाहेर जाणारे चेंडू टाकल्यानंतर पुढचा चेंडू आतल्या दिशेला आणत शाहीनने रोहितचा त्रिफळा उडवला होता. मात्र, पुढील सामन्यात नेपाळविरुद्ध रोहितने आक्रमक अर्धशतक झळकावले. आता शाहीनविरुद्ध आक्रमक मानसिकतेने खेळण्याबाबत रोहितला विचार करावा लागू शकेल. मधल्या फळीत श्रेयस अय्यरचा खेळपट्टीवर वेळ घालवण्याचा मानस असेल. तसेच राहुल/किशन आणि हार्दिक यांची कामगिरीही भारतासाठी महत्त्वाची ठरेल.
बुमराच्या कामगिरीकडे लक्ष
दुखापतीतून सावरल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे जवळपास १४ महिन्यांनंतर भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन झाले. तो पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात खेळला. मात्र, पावसामुळे बुमराला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव तो मायदेशी परतला आणि त्याला नेपाळविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. त्यामुळे ‘सुपर फोर’ फेरीतील लढतीत बुमराचे खऱ्या अर्थाने पुनरागमन होऊ शकेल. त्याला अंतिम ११ खेळाडूंत स्थान देताना भारताला मोहम्मद शमीला संघाबाहेर करावे लागू शकेल. शमीने नेपाळविरुद्ध २९ धावांत एक बळी मिळवला होता, तर मोहम्मद सिराजने ६१ धावांत तीन बळी मिळवले होते. परंतु, पाकिस्तानविरुद्ध साखळी सामन्यात सिराज खेळला होता आणि या सामन्यातही त्याचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. फिरकीची धुरा रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल. त्यांना बाबर आझम, इमाम-उल-हक, फखर झमान आणि मोहम्मद रिझवान यांना रोखण्याचे आव्हान असेल.
वेळ : दुपारी ३ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी, हॉटस्टार
🪀 तुम्ही WhatsApp Group Admin आहात❓तर आत्ताच जाणून घ्या तुमची “पॉवर”‼️
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/03/23/तुम्ही-whatsapp-group-admin-आहात-तर-आत्ताच-ज/