Alert : जाहिरात वाचून रांजणगाव MIDC मध्ये जॉबला जाताय तर…
सध्या जॉब च्या शोधात महाराष्ट्रातील हजारो तरुण आहेत. सागळ्यांलाच चांगला जॉब वेळेवर भेटत नाही यामूळ तरुण नौकरी च्या शोधात असतात भेटेल ती नौकरी करतात.
याचाच फायदा या पुण्यातील टोळीने घेयला सुरु केले आहे.
या बद्दल सविस्तर माहिती अशी की, काही पेपर मध्ये छोट्या जाहिरातीत रोज एक जाहिरात येते, त्या जाहिरातीतील मजकूर,
“LG, Haier या कंपनीत पर्मनंट भरती सुरु आहे, पात्रताः 10वी, 12वी, कोणतीही पदवी असलेले sallery: 16000 ते 24000 + राहणे जेवण ….या नंबर वर संपर्क करा….
असा मजकूर त्या जाहिरातीत असतो, त्या नंबर वे कॉल केला तर एक महिला बोलते, ती जाहिरातीतील माहितीच कॉल वर सांगते, बाकीची माहिती तुम्हालाइथे आल्यावर सांगतोल असे म्हणते, आणि येताना 2000 रुपये फीस, 2 फोटो आणि ओळख पत्र घेऊन या हे न विसरता सांगते.
पत्ता विचारला असता रांजणगाव (पुणे) ला उतरल्यावर कॉल करा आम्ही तुम्हाला घेयला येतोत म्हणते. गरजू मूलं त्यांच्या बोलण्यात फसतात, रांजणगावला गेल्यावर कॉल केला असता ते म्हणतात गणपती मंदिर समोर हायवे वर थांबा.
कोना कडून 3000 तर को कडून 5000 फीस घेतली असते.
संद्यकाळी 7 वाजता शिफ्ट ला जाताना तो व्याक्ती परत येतो, आपल्या जवळचे मोबाइल त्यarsupp सांगतो आणि एका फॅक्टरी मध्ये नेतो, त्या फॅक्टरीचा आणि LG कंपनीचा काहीच संबंध नसती,
तो व्यक्ती परत म्हणतो ८ दिवस इथं तुमची training आहे नंतर LG मध्ये पर्मनंट लावणार. विद्यार्थ्यांकडे काहीच पर्याय नसल्याने ते जाऊद्या इतकं केलाय तर फॅक्टरीत एक दिवस जाऊन बघुयात नंतर पुढचं बघू असा विचार करून तयार होतात.
पण कंपनीत गेल्यावर त्यांला कळत कि काम हे पूर्ण worker चे असते जे त्यांला कॉल केल्यावर सांगितलेले नसते. रात्रभर त्या विद्यार्थ्यांकडून ते काम करुन घेतात.
जेवायच्या वेळी इतकं खराब दर्जाचं जेवण देतात ते कोणीच खाऊ शकणार नाही.
कंपनीत काम करताना जे आधीचे worker तिथे काम करत होते ते जवळ जवळ सगळेच उत्तर प्रदेश बिहार चे होते.
त्यांनी सांगितलं ते 4 महिन्या पासून जॉब करतायत आणि त्यांचा पगार केलाच नाहीय नुसतं देतो देतो म्हणून त्यांला अडकवून ठेवलं होतं.
ते worker विद्यार्थ्यांला उद्याच परत जा नाहीतर हे तुम्हाला आमच्या सारखं अडकवून ठेवतेल असे म्हणाले. दुसऱ्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी परत घरी जायचं ठरवलं पण त्यांचा mobile त्या व्यक्ती कडे होता.
>>> येथे क्लिक करा <<<