X

Agriculture News : कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा

Agriculture News : भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षांचा काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत या वर्षाअखेर देशात 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. निश्चितचं ही देशाच्या विकासासाठी एक गरजेची बाब असून यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा हा वैयक्तिक अधिकार आहे.

मात्र, प्रत्येक क्षेत्रात वैश्विक पटलावर आपला ठसा उमटवणाऱ्या हिंदुस्थानात बळीराजा मात्र आजही नानाविध अशा संकटांमध्ये गुरफटलेला आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी ढगाळ हवामान, तर कधी वादळी वारे यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे नेहमीच शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. या नैसर्गिक संकटाचा सामना करत बळीराजा आपलें शेती पिके वाचवण्यासाठी मेहनत घेत असतो.

मात्र या पिकांच्या पोषणासाठी आवश्यक खतांच्या उपलब्धतेसाठी देखील शेतकरी बांधवांना तारेवरची कसरत करावी लागते. शेतकऱ्यांना नेहमीच खतटंचाईचा सामना करावा लागतो.

मात्र अनेक प्रसंगी अस आढळून आल आहे की दुकानदार आपल्या स्वार्थासाठी खतांचा स्टॉक उपलब्ध असतानाही मुद्दामहुन खतटंचाई घडवून आणतात. जेणेकरून, दुकानदारांना महागड्या दरात खतांची विक्री करता येईल.

निश्चितच, प्रत्येकचं दुकानदार असं करत नाही. परंतु अनेक दुकानदार अशा पद्धतीने कृत्रिम खत टंचाई करतात आणि यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते. मात्र आता शेतकरी बांधवांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातून प्रत्यक्षात आपल्या जवळील खताच्या दुकानात किती खताचा स्टॉक उपलब्ध आहे हे जाणून घेता येणार आहे. यामुळे जी काही कृत्रिम खत टंचाई दुकानदारांच्या माध्यमातून केली जाते यावर आळा घालण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी दुकानात जाण्यापूर्वीच खताच्या दुकानात स्टॉक उपलब्ध आहे की नाही याची माहिती मिळू शकणार आहे. विशेष बाब म्हणजे हे ॲप्लिकेशन भारत सरकारच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे हे ॲप्लिकेशन पूर्णतः सुरक्षित असून यामध्ये दिलेली माहिती ही योग्यच राहणार आहे.

या पद्धतीने चेक करता येणार खत दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे

शेतकरी मित्रांनो, आपल्या जवळील खतांच्या दुकानात खताचा साठा शिल्लक आहे की नाही हे पाहण्यासाठी आपणास भारत सरकारच्या खत विभागाच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. https://www.fert.nic.in/ या भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आपणास खतांच्या साठाची माहिती उपलब्ध होणार आहे.

या वेबसाईटवर गेल्यानंतर Fertilizer Dashboard (फर्टीलायझर डॅशबोर्ड) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर मग e-Urvarak नावाचा एक नवीन पेज आपल्या पुढ्यात या ठिकाणी उघडेल. मग या नवीन पेजवरील किसान कॉर्नर या पर्यायावर आपणास क्लिक करावे लागणार आहे.

यानंतर मग Retailer opening stock as on today या पेजवर आपणास रिडायरेक्ट केले जाणार आहे. यानंतर मग आपलं राज्य, दुकानदाराचा आयडी, माहीती नसेल तर एजन्सीचं नाव. जर ते देखील माहिती नसेल तर All हा पर्याय तसाच राहू द्या. मग शो या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.

यानंतर मग तुम्हाला जिल्ह्यातील कोणत्या दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे याची माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून कळणार आहे. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानाचा रिटेलर आयडी निवडला की त्या दुकानात किती खताचा साठा शिल्लक आहे ते समजतं.

यामध्ये संबंधित दुकानदाराकडे कोणत्या कंपनीचा किती साठा शिल्लक आहे याची सर्व माहिती असते शिवाय दर देखील दिलेले असतात. मात्र अनेकदा दर अपडेट केलेले नसतात त्यामुळे अपडेटेड दर व सर्वप्रथम जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक ठरणार आहे.

निश्चितच ही वेबसाईट भारत सरकारच्या माध्यमातून विकसित करण्यात आली असल्याने ही वेबसाईट वापरण्यासाठी सुरक्षित असून या वेबसाईट मध्ये दिलेली माहिती ही योग्य असते. म्हणजेच या वेबसाईटमुळे शेतकरी बांधवांना आता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या जवळील खताच्या दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे याची माहिती मिळवता येणार आहे.

This post was last modified on %s = human-readable time difference 12:20 pm

Categories: शेती
Davandi: