Aadhaar Card, Pan Card बनवण्यासाठी आता जास्त इकडे-तिकडे फिरण्याची गरज भासणार नाही. तुम्ही अगदी घरबसल्या देखील सहज पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवू शकता. तर हेच कसं कराल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
खालील प्रोसेस पहा
प्रत्येक भारतीयाची ओळख म्हणजे आधार कार्ड तसंच अतिशय महत्त्वाचं आणखी एक डॉक्यूमेंट म्हणजे पॅन कार्ड. आता या दोन्हीपैकी एकही कोणतं डॉक्यूमेंट हरवलं, तर कोणीही व्यक्ती चिंतेत पडू शकतो. कारण या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
पण आता तुमचं असं महत्त्वाचं कागदपत्रं हरवल्यास, काळजी करण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीने ते परत मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ नेमकी प्रक्रिया…
Aadhar Card: आता मागील काही वर्षात आधार कार्ड फारच महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक भारतीयाची विशिष्ट ओळख म्हणून हे आधार कार्ड ओळखलं जातं. त्यामुळे यात कोणतीही छोटी चूकही तुमचं नुकसान करु शकते. तसंच आधार कार्ड हरवल्यासही तुम्हाला फार तोटा होऊ शकतो.
हे ही वाचा : सावधान ! WhatsApp वर ‘या’ नंबरवरुन फोन आला तर उचलू नका! अन्यथा….
पण आता तुमचं आधार कार्ड हरवल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही, काही स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही ते घरबसल्या डाउनलोड करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Uidai या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला Download Aadhaar च्या पर्यायावर जावे लागेल. यानंतर UIDAI तुम्हाला तुमचा पत्ता विचारते. सर्व गोष्टी भरल्यावर तुमच्या अधिकृत फोन नंबरवरील ओटीपीच्या मदतीने तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.
Pan Card: UTIITSL च्या वेबसाइटला भेट देऊन, तुम्हाला पॅन कार्ड सेवांच्या पर्यायावर जावे लागेल. तुम्ही अधिकृत साइटवरून पॅन कार्ड सहजपणे काढू शकता. अनेक लोक ही सेवा वापरत आहेत. तुम्हीही सोप्या पद्धतीने हे करु शकता.
हे ही वाचा : phone is lost : फोन हरवल्यास Google Pay, Paytm आणि Phone Pe खाते कसे ब्लॉक करावे?काळजी करू नका या स्टेप्स फॉलो करा
तुम्हाला सर्वात आधी अनेक तपशील विचारले जातील ज्यामध्ये पॅन, जन्मतारीख, जीएसटीआयएन क्रमांक, कॅप्चा इत्यादी भरावे लागतील. यानंतर तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकता.