X

Aadhar -Pan : आधार-पॅन कार्ड लिंकिंगबाबत मोठी बातमी

नवी दिल्ली: सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंकिंगसंदर्भात मोठी माहिती दिली आहे. आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत होती. मात्र आता सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे.

सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

तीन महिन्यांची मुदतवाढ पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२३ ही अंतिम तारीख होती. मात्र आता लिंकिंगसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता 30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करता येणार आहे. पण जर नियोजित तारखेपर्यंत लिंकिंग केले नाही तर तुमच्या पॅनकार्डचा काही उपयोग होणार नाही.

दरम्यान, पॅनकार्ड हे आर्थिक कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे, मुदत वाढवण्यात आली आहे पण दंडाची रक्कम तशीच आहे… आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली असली तरी, दंडाची रक्कम बदललेली नाही.

अशा परिस्थितीत ज्यांनी अद्याप आधार-पॅन लिंक केलेले नाही ते 1000 रुपये भरून ते लिंक करू शकतात. 10,000 दंड आकारला जाऊ शकतो.

एकदा पॅन कार्ड बंद केल्यानंतर, तुम्ही ते कोणत्याही आर्थिक कामासाठी कागदपत्र म्हणून वापरू शकत नाही. मात्र, जर तुम्ही ते कागदपत्र म्हणून वापरत असाल तर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

PAN-Aadhaar ला लिंक कसे करायचे

  • प्रथम incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा आणि आधार लिंक पर्याय निवडा.
  • या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रथम तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक टाकावा लागेल.
  • त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकून नंतर एंटर करावा लागेल. आधार कार्डावरील नाव.
  • वरील सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर, खालील सत्यापन कोड प्रविष्ट करा आणि ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचे आधार कार्ड पॅनशी लगेच लिंक केले जाईल.
  • आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला वन टाईम पासवर्ड मिळेल.
  • तुम्हाला तो पासवर्ड टाकावा लागेल आणि पुढे जावे लागेल

This post was last modified on %s = human-readable time difference 4:32 am

Davandi: