मित्रानो, तुम्हाला सरकारच्या कोणत्याही सबसिडी / योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्या आधार कार्ड ला NPCI बँक खात्याशी शी लिंक करावे लागेल, जर तुमचे आधार-NPCI लिंक नसेल तर तुम्ही या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही किंवा यामध्ये अडथळे येऊ शकतात. यालाच आधार बँक सिडींग म्हटले जाते.
बऱ्याच वेळा आपण बँकेच्या भरवश्यावर राहतो आणि हि काळजी घेत नाही कि बँकेने तुमचे आधार सीडींग केले आहे कि नाही, पण आता याची गरज नाही तुम्ही स्वतः देखील हे तपासू शकता आणि हे अतिशय सोप्पे आहे.
DBT Bharat या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या,
लिंक बायो मध्ये आहे किंवा गुगल करा. इथे आल्यावर Documents मध्ये Aadhar/UIDAI या पर्यायावर क्लिक करा, इथे पहिला पर्याय Citizen Corner निवड आणि Citizen’s Bank Account-Aadhaar linking status या पर्यायावर क्लीक करा.
इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल त्यानंतर
OTP मिळेल तो टाकावा लागेल . एवढं करताच तुम्हाला तुमचे कोणते बँक अकाउंट NPCI शी लिंक आहे हे दिसेल, जर इथे खाते आणि सीडींग नंबर दिसत नसेल तर तुम्हाला ते करावे लागेल..
हे ही वाचा : – Talathi bharti: तलाठी भरती परीक्षेचा उडाला गोंधळ! तब्बल 12000 विद्यार्थ्यांना नाही देता आली परीक्षा…..
ते कसे करणार ?
त्यासाठी पुन्हा DBT भारत च्या संकेतस्थळावर जाऊन अगोदर निवडलेल्या पर्यायांपैकी
(Documents -> Aadhar) शेवटचा पर्याय Background on Aadhaar seeding on NPCI mapper निवडा इथे तुम्हाला आधार सीडींग चा फॉर्म मिळेल तो भरून तुम्हाला बँक मध्ये जाऊन सबमिट करावा लागेल.
इथे तुम्हाला कोणतीही ऑनलाईन सुविधा नाही बँक मध्ये तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन द्यावा लागेल.
बऱ्याच जणांचा गैरसमज असतो कीं आधार – बँक लिंकिंग आणि आधार सीडींग या सेम प्रक्रिया आहेत, पण असे नाही बँक खाते चालू करताना घेतलेले आधार हे बँकेशी लिंक असते (KYC) पण बऱ्याच वेळा बँक आधार सीडींग करत नाही तेव्हा हा फॉर्म वेगळा भरावा लागतो.
माहिती नक्की बुकमार्क करा आणि शेअर करा
हे ही वाचा : – तलाठी भरतीचे पेपर फोडला : पोलीस भरतीतील फरार आरोपीने पेपर फोडला!
मित्रांनो, काही जणांना मोबाईल वर लिंक ओपन होत नाहीये त्यांनी क्रोम मध्ये डेस्कटॉप व्ह्यू घ्यावा.