Aadhar link Bank : रोज अनेक महिला माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत. मात्र बँक खात्याशी आधार नंबर लिंक असेल तरच महिलांना या योजनेचे पैसे मिळत आहेत. आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण 27 लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर घरबसल्या आधार क्रमांक बँक खात्याला कसे लिकं करायचे? हे आपण जाणून घेणार आहोत.
Aadhar link Bank : सर्वांत अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही? हे कसे तपासावे ते पाहुयात. हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या https://uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही? असे तपासावे?
● त्यासाठी गुगल वरती सर्च करा My Adhar
● आता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा.
● आता तुम्हाला तुमचा आधार नंबरने लॉगिन करायचे आहे. त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा भरावा लागेल.
● त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो टाका.
● ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉगिन झाले आहात.
● आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल.
● आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा.
● आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या बँकेचे नाव, आणि तुमचा खाते अॅक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल.
आता आपण बँकेला आधार क्रमांक कसा लिंक करायचा ते समजून घेऊया? >>> येथे क्लिक करा <<<
This post was last modified on %s = human-readable time difference 7:40 am