आधार कार्ड हा व्यक्तीच्या जन्म तारखेचा पुरावा नाही, असं स्पष्ट करत शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं पुणे पोलिसांना खडे बोल सुनावले. आरोपी अल्पवयीन आहे की नाही?, याचा शोध पुणे पोलिसांना आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्म तारखेच्या आधारे घ्यायचा होता.
मात्र जन्मतारीख शोधायची असेल तर जन्म दाखला किंवा अन्य कागदपत्रे तपासा, यासाठी आधार कार्डची काय गरज नाही. या शब्दांत हायकोर्टानं पुणे पोलिसांची कान उघडणी केली. मुळात आधार कार्ड हा वास्तव्याचा पुरावा आहे.
हे ही वाचा : रेशन कार्ड मध्ये नवीन नावे ॲड करायचे
त्याचा वापर जन्मतारीख तपासण्यासाठी केला जाऊ शकत नाही. आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरु नये, असं केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयानंही स्पष्ट केलेलं असतानाही पुणे पोलिसांनी ही याचिका का केली?, असं नमूद करत हायकोर्टानं पुणे पोलिसांची याचिका फेटाळून लावली.