ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर ते तुमचे सर्व अकाऊंट एका क्षणात खाली करू शकतात.
आता तुम्ही म्हणाल बायोमेट्रिक कसं चोरणार ?
हो ते देखील चोरी होऊ शकतं…
बायोमेट्रिक ओळख सुधा चोरली जाऊ शकते याची बरीच उदाहरणे तुम्हाला बातम्यांमध्ये मिळतील, जमिनीच्या कागदपत्रांवरून अंगठ्याचे ठसे चोरून झालेली आधार कार्ड फसवणूक ची केस, त्यानंतर नकली रबरचा अंगठा बनवून झालेली फसवणूक बरच काही.
आता ही बायोमेट्रिक माहिती ती व्यक्ती तिथे नसतानाही आधार मधून चोरली जाऊ शकते हे तुम्हाला कळलं असेलच मग आता त्यापासून वाचायचं कसं ?
तुम्ही ही माहिती जपण्यासाठी तुमचं आधार लॉक 🔐 करू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच अनलॉक 🔓 करू शकता.
यासाठी काय लागेल ?
UIDAI ला लॉक करण्यासाठी १६ अंकांचा व्हीआयडी नंबर असणे गरजेचे आहे.
कार्ड लॉक करायचे असेल तर VID आवश्यक आहे. जर एखाद्याकडे व्हीआयडी नसेल तर तो एसएमएस सेवा किंवा वेबसाइटद्वारे जनरेट करू शकतो.
आधार लॉक करण्याची प्रक्रिया
१.सर्वप्रथम युआयडीएआय च्या वेबसाईटवर जा लिंक बायो मध्ये आहेच.
२. मग माय आधारवर क्लीक करून आधार लॉक-अनलॉक वर क्लिक करा
३) आधार नंबरवर व्हिआयडी टाका.
४) Captcha भरून OTP नंबर येण्यासाठी क्लिक करा.
५) तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी क्रमांक टाका.
६) आलेला ओटीपी नंबर टाकल्यावर सबमिट करा बटणावर क्लिक करा
तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक केली जाईल.
तुम्हाला याचा परत उपयोग करायचा असेल तर ही माहिती अनलॉक करावी लागेल. ती सुधा याच प्रक्रियेने होईल फक्त अगोदर जिथे तुम्हाला लॉक चा पर्याय निवडला होता तिथे अनलॉक चा पर्याय निवडा आणि OTP टाकून सबमिट करा
आहे ना सोप्प ..
मग आजच आपलं आधार लॉक करा आणि फसवणूक होण्यापासून वाचा…
ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा