👉 काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.
👉 तुमचे घरचे माणसं पहिले काही दिवस नातेवाईकांनी आणून दिलेले जेवण जेवतील व नंतर हळूहळू पुर्वस्थितीत येतील.
👉 नातवंडे धावत-खेळत राहतील.
👉 तुमच्या निघून जाण्यानंतर काही लोक तुमच्याबद्दल काही टिप्पणी करतील!
👉 दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.
👉 जमाव हळूहळू पांगू लागेल..
👉 काही दिवसांनंतर, तुमचे घरचे तुम्ही कमावलेली संपत्ती कशा रितीने वाटून घ्यायची याची चर्चा सुरू करतील.
👉 येत्या काही दिवसात, तुम्ही मेला आहात हे माहीत नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात.
👉 दोन आठवड्यांत तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील.
👉 महिनाअखेरीस तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हुळूहळू हसायला लागेल.
👉 तुम्ही ज्या पदावर होता त्या पदावर आता दुसरा कोणीतरी व्यक्ती असेल.
👉 प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल.
👉 जसे एखाद्या मोठ्या झाडाचे सुकले पान.
👉 आणि आपण कशासाठी जगतो आणि मरतो यात काही फरक नसतो.
👉 हे सर्व इतक्या सहजतेने, इतक्या सहजपणे, कोणतीही हालचाल न करता घडते.
👉 या जगात विस्मयकारक गतीने तुमचे विस्मरण होईल.
👉 दरम्यान, तुमची प्रथम पुण्यतिथी, प्रथम वर्षश्राद्ध मोठ्या दिमाखात केले जाईल.
👉 अतिवेगाने वर्षे उलटून जातील आणि आता तुमची कोणालाही आठवण येणार नाही.
👉 आता सांगा…👇
👉 लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहत आहेत.
👉 मग तुम्ही कशासाठी धावत आहात?
👉 आणि तुम्हाला कशाची काळजी आहे?
👉 योग्य आणि नैतिक मार्गाने संपत्ती कमवा, गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नका.
👉 आयुष्य फक्त एकदाच मिळते, फक्त ते निस्वार्थी भावनेने व प्रेमळ मनाने जगा.
👉 इतरांपेक्षा स्वतः च स्वतः ला श्रेष्ठ समजवून इतरांना कमी लेखू नका, त्यांचा अपमान करू नका.
👉 आयुष्यात पद, सत्ता एका विशिष्ट वयानंतर येते आणि एका विशिष्ट वयानंतर निघून जाते,….
👉 होय, एक गोष्ट… 👇
👉 …आणि आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला प्रेमाने निरपेक्ष मदत करा, तो तुमची नेहमी आठवण ठेवेल.
👉 आपल्या अस्तित्वाचा अहंकार सोडा.
👉 सत्कर्म करत रहा.
👉 हेच खरे जीवन आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 11:47 am