इम्युनिटी कमकुवत असल्यास शरीर देते हे 4 संकेत जाणून घ्या खालील प्रमाणे
▪️ पोट खराब होणे : जर तुमचे पोट वारंवार खराब होत असेल किंवा तुमची पचनशक्ती बिघडली असेल तर ते तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्याचे लक्षण आहे. तेव्हा तुम्ही वेळीच सावध व्हावे.
▪️ जखम लवकर बरी न होणे : जर तुमचे फुंसी फोड लवकर बरे होत नसतील किंवा ते बरे होण्यास बराच वेळ लागत असेल, तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होत असल्याचे हे लक्षण आहे.
हे वाचलंत का? उन्हाळ्यामध्ये हळदीचे दूध आरोग्यासाठी कितपत योग्य हळदीचे दूध पिण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
▪️ सतत तणावात राहाणे : तुम्हाला प्रत्येक वेळी तणाव जाणवत असेल किंवा अगदी थोडीशी प्रतिकूल गोष्ट ऐकूनही तुम्ही घाबरत असाल तर ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत निष्काळजीपणा करू नये.
▪️ वारंवार सर्दी : वारंवार सर्दी, खोकला किंवा ताप येणे हे देखील कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण आहे. यासोबतच कान दुखणे किंवा कानातून स्त्राव होणे हे देखील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचे लक्षण आहे.
हे ही वाचा : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार..!
This post was last modified on May 12, 2023 10:18 am