X

📢दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 12/3/23

हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढणार? धाडीनंतर ईडीने बजावलं समन्स
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या घरी ९ तास चौकशी केली

धक्कादायक! इमारतीवरून लोखंडी सळई रिक्षावर पडली, माय-लेकिचा मृत्यू; जोगेश्वरीतील घटना

GGW vs DCW: शफाली वर्माने गोलंदाजांना फोडला घाम, वादळी अर्धशतकामुळे दिल्लीचा गुजरातवर एकतर्फी विजय

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंचा काँग्रेस, ठाकरे गटावर आरोप;

अतिवृद्ध, विकलांगांसाठी घरून मतदानाची सुविधा; कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच प्रयोग

“माझं तुम्हाला ओपन चॅलेंज, मी MIDC आणली, तुमच्या ऐपतीने…” धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना आव्हान
धनंजय मुंडे म्हणाले की, “मी आपल्याकडे एमआयडीसी आणली आहे. तुम्ही आता तिथे एखादा मोठा प्रकल्प आणा.”

अवकाळी पाऊसाचा २५० हेक्टरला फटका, वाढलेल्या तापमानामुळे आंबा पिक संकटात
तापमान वाढल्यामुळे आंब्याची फळ मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरवात झाली आहे. आंब्यावरील संकटामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे उद्घाटन पुढील वर्षी; नितीन गडकरी यांची माहिती

राज्यभर उन्हाच्या झळा; सोमवारनंतर पुन्हा पावसाच्या सरी

चीनच्या लोकप्रतिनिधीगृहाने शनिवारी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांचे जवळचे सहकारी ली कियांग यांच्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तब केले.

अवघ्या दोन महिन्यांत मोदींचा कर्नाटकात पाचवा दौरा, सत्ता कायम राखण्यासाठी आटापिटा
गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान मोदी हे उद्या पाचव्यांदा राज्याच्या दौऱ्यावर येत असून, विविध विकास कामांचा पायाभरणी समारंभ किंवा उद्घाटने त्यांच्या हस्ते पार पडतील.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका :शुभमनचे संयमी शतक
India vs Australia 4th Test Seriesसर्व प्रारूपांत चांगल्या लयीत असलेल्या गिलने २३५ चेंडूंचा सामना करताना १२८ धावा केल्या ज्यामध्ये १२ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे.


इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष मोहित जोशी यांचा काल राजीनामा, आता ते टेक महिंद्रामध्ये सीईओ व मॅनेजिंग डायरेक्टर पदावर रुजू होणार.

देशातील पहिला ‘ट्रान्स टी स्टॉल’ आसाममध्ये सुरु. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर उभारला पहिला ‘ट्रान्स टी स्टॉल’, तृतीयपंथीयांच्या सशक्तीकरणासाठी पूर्वोत्तर रेल्वे विभागाने घेतला हा निर्णय निर्णय.

सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती नीती आयोगाने दिली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याव्हे आवाहन देखील नीती आयोगाने केकेले आहे.

भारतीयांसाठी अमेरिकेतील जॉब व्हिसा मिळणं सोपं होणार आहे कारण सध्या व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकन संसदेत नवीन कायदा विधेयक सादर करण्यात आले आहे.

अमेरिकेमधील सध्याच्या फेडरल इमिग्रेशन कायद्यानुसार, दरवर्षी व्यवसाय किंवा नोकरीसाठी व्हिसा मंजूर केला जातो. त्याचा योग्य वापर व्हावा म्हणून डेमोक्रॅटिक पक्ष्याचे नेते राजा कृष्णमूर्ती आणि GOP चे लॅरी बुशान यांनी हे विधेयक सादर केले आहे.

राज्यात उन्हाळ्यानंतर दुष्काळ येण्याचे अमेरिकेची हवामान अभ्यासक संस्था ‘नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ ने सांगितले आहे. कारण हिंदी महासागराच्या तापमानातील तफावत दाखवणारा घटक ‘एल निनो’ चा प्रभाव वाढणार आहे.

सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी: दापोलीतील कथित साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी रामदास कदमांच्या बंधूच्या अडचणीत वाढ

आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका!: ईडी कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला अश्रू अनावर, म्हणाल्या- किती त्रास देणार?

CM एकनाथ शिंदे यांची शिवाजी महाराजांसोबत तुलना: नव्या वादाला तोंड; मनसे आमदार राजू पाटलांनी मनाची तरी चाड ठेवा म्हणत सुनावले!

पत्नीच्या हत्येच्या आरोपीची 40 वर्षांनी निर्दोष सुटका: सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली उच्च न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा

निती आयोगाकडून गोमूत्र-शेणाचा अहवाल: म्हटले- शेतीत वापर वाढविण्याची गरज, रासायनिक खते मानवी आरोग्यास हाणीकारक

62 वर्षांनंतर ऑस्करच्या रेड कार्पेटचा रंग बदलला: 1961 पासून सुरु असलेली ऑस्कर अवॉर्डची ओळख बदलणार

2046 मध्ये नष्ट होणार जग?: पृथ्वीवर धडकणार विशाल लघुग्रह, NASA ने जारी केला धोक्याचा इशारा!

भारत पहिल्या डावात 289/3: 14 महिने आणि 15 डावांनंतर कोहलीचे अर्धशतक, गिलचे वर्षातील 5 वे शतक

WPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 10 गडी राखून मिळवला विजय: 7.1 षटकांत 106 धावांचे लक्ष्य गाठले;शेफालीचे फिफ्टी, कॅपने घेतले 5 बळी

टेम्बा बावुमाने सात वर्षांनंतर ठोकले शतक: वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 287/7

कार्डियाक अरेस्टनेच सतीश कौशिक यांचा मृत्यू: पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा, फार्म हाऊसच्या 7 तासांच्या CCTV फुटेजचा तपास होणार

खतरनाक! २८ चेंडू…१० चौकार अन् ५ षटकार, WPL मध्ये शफाली वर्माने ठोकल्या ७६ धावा,

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

💁🏻‍♂️ खालील लिंक जॉईन करा👇
📲 [ https://davandi.in ]

📲https://t.me/joinchat/AAAAAFTAZGcUVi1gPndsGQ

🔔सदस्य व्हा/सबस्क्राईब करा👇

🎥 https://youtube.com/channel/UCXPrglhlmOM0Htek_noUASA

📢 जाहिरात संपर्क📲 9975167791

This post was last modified on %s = human-readable time difference 2:09 am

Davandi: