‘या’ शुभ मुहूर्तापासून बक्कळ धनलाभाची संधी
Mahashivratri Shubh Yog: महाशिवरात्रीला नेमक्या कोणत्या तिथी व शुभ मुहूर्तावर शिवभक्तांना लाभ होण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊयात.
Maha Shivratri 2023 Tithi, Shubh Muhurta, Puja Vidhi: महाशिवरात्र हा सण संपूर्ण भारतात आनंदाने आणि उत्साहात साजरा होतो. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची उपासना केली जाते. शिवपिंडीची फक्त पूजा आणि अभिषेक न करता, शिव हे तत्त्व आत्मसात करण्याचा उत्तम आणि मंगल दिवस म्हणजे महाशिवरात्री. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा ७०० वर्षांनी महाशिवरात्रीला अत्यंत शुभ व दुर्लभ असे पाच महायोग जुळून आले आहेत. यंदाच्या महाशिवरात्रीला नेमक्या कोणत्या तिथी व शुभ मुहूर्तावर शिवभक्तांना लाभ होण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊयात.
ज्योतिषीय अभ्यासकांच्या माहितीनुसार यंदा ७०० वर्षांनी पहिल्यांदाच महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योगासह शश, केदार, शंख, वरिष्ठ असे एकूण पाच महायोग जुळून आले आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी त्रयोदशी व चतुर्दशी अशा दोन तिथी सुद्धा जुळून आल्या आहेत. या शुभ योगाने १२ राशींना धनलाभाचे संधी आहे.
महाशिवरात्री संबंधित सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न पाहूया
१) महाशिवरात्री २०२३ ची तारीख, तिथी व शुभ मुहूर्त
२०२३ ची महाशिवरात्र ही १८ फेब्रुवारी २०२३ ला रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी सुरु होत आहे तर १९ फेब्रुवारीला संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी तिथी समाप्त होत आहे. या संपूर्ण २० तासात आपण कधीही शिवशंकराचे पूजन करू शकता.
२) महाशिवरात्री पूजा विधी वेळ:
वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची उपासना केली जाते. काही ठिकाणी कडक उपास केला जातो. काही ठिकाणी एकाच वेळेला अन्नग्रहण केले जाते, तर काही ठिकाणी दीड दिवसाचा उपास केला जातो. कोणी पंचामृताने, कोणी दुधाने तर कोणी पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक करतात. शिवाला बेल आणि धोत्र्याची फुले वाहिली जातात. काही ठिकाणी महिला दिवस उपास करून रात्री जागरण करून शिवाची आराधना करतात.
३) महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावे?
महाशिवरात्रीच्या उपवासाला पांढरे मीठ सुद्धा टाळले जाते याऐवजी आपण सैंधव मीठाचा पर्याय वापरू शकता. यादिवशी हलका फलाहार घ्या, ड्रायफ्रूट्स किंवा साबुदाण्याच्या खिचडीचे सेवन करू शकता.