शून्य सावली दिवस, येत्या 19 तारखेला दुपारी सावली सोडणार तुमची साथ, दोन दिवस अनुभव घेता येणार..
💁🏻♂️ शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे, कारण या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटांसाठी सोडून जाते.
येत्या १९ मे रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी शहरवासीयांना हा अनुभव घेता येईल अशी माहिती एमजीएम च्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
हे ही वाचा : – Numerology : या जन्म तारखेचे लोक जन्माने भाग्यवान असतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून पैसे मिळवता येतात
🌞 सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५° दक्षिण आणि २३.५° उत्तरेकडे असतो, म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी डोक्यावर येतो आणि दोन वेळा शून्य सावली दिवस येतात.
या वेळी सूर्य दररोज 0.50° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर साधारण दोन दिवस राहतो त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.
⏰ सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. यासाठी खगोल प्रेमींनी दुपारी १२.०० ते १२.३५ या वेळेत सूर्य निरीक्षण करावे. मोकळ्या जागी, घराच्या छतावर किंवा अंगणात गेले तरी सावली पाहता येते.
हे ही वाचा : – what to do/what not to do काय करावे आणि काय करु नये???
खगोल प्रेमींना एमजीएम च्या केंद्रात सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे औंधकर यांनी सांगितले.
हि माहिती इतरांना पण शेअर करा