सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 मार्च 2023

सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आज अखेरचा दिवस!, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तारखेची उत्सुकता
राज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना पक्षाच्या फुटीवर, सर्वोच्च न्यायालयात काही महिने सुरू असलेली सुनावणी बुधवारी संपेल.

शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि…”, एकनाथ शिंदेंचं संपकऱ्यांना आवाहन

पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता
पावसाच्या सरींसह सोसाटय़ाचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार (१८ मार्च) पर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात आला आहे.

निवृत्तिवेतन योजनांच्या अभ्यासासाठी समिती, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; तीन महिन्यांत अहवाल

नवी मुंबईत व्हायरल तापाची साथ, बाह्यरुग्णांत ५०% रुग्ण ताप, सर्दी, खोकल्याचे
गेल्या काही दिवसांपासून देशासह इतर शहरात इन्फल्युन्झाचा (H3N2) संसर्ग वाढत आहे

नाशिक : उद्या वणीत प्रजासत्ताक संचलनातील साडेतीन शक्तिपीठ चित्ररथाचे प्रदर्शन
चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

पुण्यात कोयता गँगचा म्होरक्या गजाआड; झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी, कोयते, तलवार जप्त
माने याच्यासह नऊ साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काेयते, तलवार, पालघन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

मोदीजी, ऑस्करचे तरी श्रेय घेऊ नका!, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा टोमणा; राज्यसभेत पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन
आरोप-प्रत्यारोपांच्या संघर्षमय वातावरणातही मंगळवारी राज्यसभेत हलके-फुलके क्षण सदस्यांना अनुभवता आले.

दोन बायका, कोर्टाचा अजब निर्णय ऐका…! मध्य प्रदेशमधल्या न्यायालयाने सोडवलं दोन बायकांचं भांडण

WPL 2023 MI-W vs GG-W: जायंटकिलर मुंबईचा अश्वमेध अजेय! गुजरातवर ५५ धावांनी विजय, ठरला प्ले ऑफ मध्ये पोहोचणारा पहिला संघ
हरमनप्रीतची अर्धशतकी खेळी अन मुंबईच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने सलग सहावा विजय नोंदवला आहे. गुजरातवर ५५ धावांनी मात केली.

अपेक्षांचे दडपण हाताळणे अवघड!, कसोटीतील शतकदुष्काळ संपवल्याचा कोहलीला आनंद

राज्यातील अत्यावश्यक सेवांना सुरळीत ठेवण्यासाठीचा कायदा करणारं विधेयक अर्थात मेस्मा लागू करण्याची तरतूद असणारं विधेयक विधानसभेत मंजूर..!

आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली..!

पुण्यात भंगार व्यावसायिकाने खोट्या कंपन्यांकडून 70.22 कोटींची खरेदी बिलं घेऊन शासनाचा 12.50 कोटी रुपयांचा GST बुडवल्याचे प्रकरण उघड..!

ठाकरेंविरोधातील बेहिशेबी मालमत्तेची याचिका फेटाळली: याचिकाकर्त्या गौरी भिडेंना हायकोर्टाने ठोठावला 25 हजारांचा दंड

सभागृहाबाहेर जुंपली: लव्ह जिहादवरून आमदार नीतेश राणे – अबू आझमींमध्ये विधानभवन परिसरात रंगली खडाजंगी

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन लागू करा: अजित पवारांची मागणी; म्हणाले नवीन पेन्शनमुळे 2005 नंतर सेवेत आलेल्यांना फटका

जगातील टॉप 100 प्रदूषित शहरांपैकी भारतातील 61 शहरे: पाकिस्तानचे लाहोर प्रथम क्रमांकावर, राजस्थानचे भिवडी तिसऱ्या क्रमांकावर

सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरी प्रकरणाचा भारतासह आशियाई बँकाना धोका नाही… आंतरराष्ट्रीय संस्था मुडीजचा निर्वाळा..!

PFI विरुद्ध NIA चे आरोपपत्र दाखल: 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचे षडयंत्र, तपास संस्थेने केला भंडाफोड

गुजरातमध्येही H3N2 चे संकट: वडोदरातील 58 वर्षीय महिलेचा विषाणूमुळे मृत्यू झाल्याची शक्यता, तपासासाठी अहवाल पाठवला

वनडे सीरीजमध्येही स्टीव्ह स्मिथकडेच कर्णधारपद: आईच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियातच राहणार कमिन्स

‘नागिन 3’ फेम कृष्णा मुखर्जी विवाहबद्ध: गोव्यात समुद्रकिनारी केले लग्न, जिंदगी ना मिलेगी दोबारा स्टाइलमध्ये केली टोमॅटिना पार्टी

‘RRR’ चा सिक्वेल लवकरच येणार: एसएस राजामौली म्हणाले – ऑस्कर जिंकल्याने आता आरआरआर सिक्वेल स्क्रिप्टला वेग येईल

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

tc
x