X

सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज घडामोडी : 18 जुलै 2023

● कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट.

● विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस, शरद पवार राहणार उपस्थित; तर दिल्लीत NDA ची महत्वाची बैठक होणार.

● BMC कथित कोविड घोटाळा प्रकरण: SIT पथक अॅक्श मोडमध्ये, कॅग अहवालानंतर महापालिका मुख्यालयात जाऊन केली चौकशी.

● भाजपसोबत जायचा प्रश्नच नाही, लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही – अजित पवारांनी घेतलेल्या भेटीनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया.

● शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी.

● गडकरी धमकी प्रकरणाचा संपूर्ण तपास मागणाऱ्या NIA च्या अर्जावर उद्या सुनावणी, तर नागपूर पोलीस शाकीर-पाशाची समोरासमोर चौकशी करणार.

● ‘फडतूस मार्ग’, उपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून रस्त्याचं नामकरण.

● काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचं आज सकाळी निधन.

● Asia Emerging Cup 2023 : नेपाळचा पराभव करत भारताची उपांत्य फेरीत धडक, बुधवारी पाकिस्तानसोबत सामना.

This post was last modified on %s = human-readable time difference 4:16 am

Davandi: