X

सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 14 जून 2023

● राज्यातील शेतकरी कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर; ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजूर.

● 70 हजार तरुणांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप; घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला : पंतप्रधान मोदी.

■पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटी योजनेची घोषणा

■किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासासाठी आणखी एक विशेष पथक; विनय कुमार चौबे यांची माहिती

■अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाची शक्यता; ठाणेकर नागरिकांना सतर्कतेचा इशारा

■गो फर्स्टची उड्डाणे 16 जूनपर्यंत रद्द; प्रवाशांना मिळणार पूर्ण परतावा

■येत्या ३६ तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता

■जम्मू काश्मीरातल्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

■लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र हेच काँग्रेसचं ध्येय, सरकारची पोलखोल करणार – नाना पटोले

● मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टँकरला आग; चार जणांचा होरपळून मृत्यू, काही काळासाठी वाहतूक ठप्प.

● राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’; शिवसेनेकडून जाहिरात; फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय असल्याचा उल्लेख.

● जाहिरात देणारा अज्ञात, शिवसेनेचा काहीही संबंध नाही – शंभुराज देसाईंकडून सारवासारव.

●लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; निवडणुकांच्या रिंगणात उतरणार सर्व केंद्रीय मंत्री.

● महाराष्ट्रच नव्हे तर देशात तीन राज्यांमध्ये भाजप-मित्रपक्षांमध्ये कुरबुरी सुरु; महाराष्ट्र, हरियाणा ते तामिळनाडू…प्रत्येक ठिकाणी युतीत ठिणग्या.

● ट्विटर बंद पाडू, अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकू’; शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारची धमकी? माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा.

● बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.

● WTC फायनलमधील पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडला BCCI कडून इशारा, गोलंदाजी आणि फलंदाजी कोचबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता.

This post was last modified on %s = human-readable time difference 3:47 am

Davandi: