X

सकाळच्या महत्वाच्या न्यूज घडामोडी : 23 जुलै 2023

सकाळच्या महत्वाच्या न्यूज घडामोडी

● नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, तीन जण पुरात अडकले; बचाव पथकाच्या मदतकार्यात पावसामुळे अडथळे.

● विदर्भात पावसाचा हाहाकार; विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 नागरिक जखमी.

● अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर पुन्हा राष्ट्रवादीत, नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता.

● राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ; अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री… अमोल मिटकरींचे ट्विट व्हायरल.

रोज 1रुपया नुसार 1 वर्षा साठी

● आज केवळ सदिच्छा भेट होती, राजकारणावर चर्चा झाली नाही, पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.

● पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडी ग्रामस्थांना ग्वाही; सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मतही व्यक्त.

हे ही वाचा : – तुम्ही सर्दी आणि फ्लूसाठी अँटीबायोटिक्स घेता का? आता थांबा, नाहीतर भयंकर परिणामांना सामोरे जा; तज्ञ काय म्हणतात ते वाचा

● इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर; मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त; परिसरात प्रवेश करण्यास पर्यटकांना बंदी

● दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि वनविभागाचा निर्णय.

● भारतासाठी तिसरा दिवस कठीण, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे दमदार प्रदर्शन; तिसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजच्या 5 बाद 229 धावा.

● Asia Emerging Cup 2023 : आज भारत विरूध्द पाकिस्तान यांच्यात रंगणार फायनलचा थरार.

This post was last modified on %s = human-readable time difference 4:16 am

Davandi: