X

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 9 एप्रिल 2023

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल तर, महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे.

अतिवृष्टी, पूर, भूकंप, दुष्काळ, सुनामी, तापमान वाढ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढतच आहे. जगभरात दरवर्षी अंदाजे वीस कोटी लोक नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होत आहेत. या आपत्तीमुळे बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी विकसनशील राष्ट्रांना १४० अब्ज डॉलरच्या आसपास खर्च करावा लागतो आहे.

मोठी बातमी ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुकूल असण्याची शक्यता आहे.

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी 1 हजार 199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 150 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह येतो –

या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. यासोबतच अमेझॉन प्राईम आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असणार.

राज्यातील अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधी राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. दरम्यान हे आदेश कसे असतील हे आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लवकरच कमी होण्याची शक्यता; सरकारी तेल कंपन्यांना विक्रीवर चांगला नफा

राष्ट्रपती मुर्मू यांचे सुखोईतून उड्डाण: प्रतिभा पाटील यांच्यानंतर अशी कामगिरी करणाऱ्या जगातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती

3,250 कोटींच्या कर्ज-फसवणूक प्रकरणात CBIची कारवाई: कोचर दांपत्य आणि धूत यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

मोदींमुळे झाले प्रभावित: भारताचे पहिले गव्हर्नर सी. राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन यांचा भाजप प्रवेश

पंजाबमध्ये सरकारी कार्यालयांच्या वेळापत्रकात बदल, 2 मेपासून सकाळी 7.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार ऑफिस

मोठी बातमी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसह अयोध्येला पोहोचले, उपमुख्यमंत्री फडणवीस देखील अयोध्येला जाणार

अजित पवार रिचेबल: औषधे घेऊन मी घरी झोपलो होतो, चुकीच्या बातम्या देऊन माझी किती बदनामी करणार- अजित पवार संतापले

बंजारा समाजातल्या तांडा वस्त्यांमध्ये सुविधा पोहोचवण्यासाठी शिवसेना भाजपा सरकार कटिबध्द

अवकाळी:अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात 522 हेक्टरमधील पिकांचे नुकसान 13.6 मिमी पावसाची नोंद

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा, संत तुकाराम महाराजांची पालखी 10 जूनला देहूतून पंढरपूरकडे जाणार

सर्वात मोठी बातमी! CM शिंदेंपाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येला जाणार

मोठी बातमी! केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकची धडक  

रिलायन्सची ताकद वाढणार, जिओ फायनान्शियल बनणार देशातील 5वी मोठी बँक

फोडाफोडीचे राजकारण: शिवसेना तुम्हीच फोडली, शरद पवार अशी कामे करत नाहीत; छगन भुजबळांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

अदानी घोटाळ्यावर भूमिका: हिंडेनबर्ग कोण माहिती नाही? जेपीसीत भाजपचेच बहुमत असेल तर ती उपयुक्त नाही- शरद पवार

राखी सावंतची तुलना फक्त अमृता फडणवीसांशी होऊ शकते’, सुषमा अंधारे यांचे भाजपच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर

CSK ने जिंकला हंगामातील पहिला एल-क्लासिको सामना: 1000 व्या IPL सामन्यात मुंबईला 7 गड्यांनी हरवले; रहाणे-जडेजा ठरले गेमचेंजर

राजस्थानचा दिल्लीवर 57 धावांनी विजय: बटलर-यशस्वीची अर्धशतके, चहल-बोल्टच्या 3-3 विकेट; दिल्लीचा हंगामातील तिसरा पराभव

नवा चित्रपट नवी जोडी: शाहिद कपूर आणि क्रिती सेननचा रोमँटिक अंदाज, अनटाइटल्ड फिल्ममध्ये धर्मेंद्र-डिंपल कपाडिया यांच्याही मुख्य भूमिका

This post was last modified on %s = human-readable time difference 3:23 am

Davandi: