X

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट -4/4/23

देशात करोनाचे ३,६४१ नवीन रुग्ण
देशात कोविड-१९ चे नवीन ३ हजार ६४१ रुग्ण आढळले असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे: उत्तरपत्रिकांची आता ऑनलाइन तपासणी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय
पहिल्या टप्प्यात या प्रणालीचा वापर विद्यापीठ संकुलातील आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी केला जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर: विवाहितेवर सामूहिक अत्याचार करून खून; तिघे कोठडीत
याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई: सुनावणी पुढे ढकलल्याने आरोपीची सटकली, थेट चप्पल काढून न्यायाधीशांवर…
कुर्ला येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात धक्कादायक प्रकार घडला आहे.

“अरे थ्थू तुमच्यावर! जरा शरम करा, अशा निर्लज्ज…”, उद्धव ठाकरेंसह राहुल गांधींवर फडणवीसांचं टीकास्र!
राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. “माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कुणाचीही माफी मागत नाही,” असं विधान राहुल गांधी यांनी केलं. राहुल गांधी यांच्या विधानानंतर महाराष्ट्रातलं वातावरण तापलं आहे.

मोठी बातमी: अभिनेत्री दीपाली सय्यदने पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं? जवळच्या व्यक्तीकडून खळबळजनक खुलासा
शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांच्या जवळच्या व्यक्तीने गंभीर आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा खळबळजनक दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन भाऊसाहेब शिंदे यांनी हे गंभीर आरोप केले

शेतमालाच्या भावाबद्दल केंद्र सरकार गांभीर्यापासून दूर
सोयाबीनच्या भावाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना केलेल्या सूचनांकडे लक्ष न दिल्याने सोयाबीनचे भाव पडलेलेच राहिले आहे.

धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवारांनी केलं भाष्य; म्हणाले, “या बाबा लोकांचे जास्त ऐकू नका. हे भोंदूबाबा आहेत,” असे अजित पवारांनी म्हटले आहे. ”
धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

राहुल गांधी यांना जामीन; दोषी ठरवण्याच्या निकालाबाबत १३ एप्रिलला सुनावणी
मानहानीच्या खटल्यात वायनाडचे बडतर्फ काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर करून दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली.

ताकदवान भ्रष्टाचाऱ्यांवर न भिता कारवाई करा! सीबीआय अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचा ‘सल्ला’;संस्थेच्या हीरक महोत्सवात विरोधकांवर टीका
देशात आता भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नाही, भ्रष्ट व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरी तिच्याविरोधात न घाबरता कारवाई करा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना दिला.

राज्यभरातील ६०० तहसीलदार आणि २२०० नायब ताहिलदारांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. कारण नायब ताहिलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागातील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. म्हणूनच हा ग्रेड पे मुद्दा घेऊन नायब ताहिलदारांनी आंदोलन पुकारले आहे.

भाजपने कॉग्रेस सरकारवर तब्बल ५ लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप लावला आहे. हा घोटाळा कॉग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंगवर लावण्यात आला आहे.

पुण्यात बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्याकडून पुन्हा आंदोलन करण्यात येत आहे. टायपिंग स्किल टेस्टमध्ये केलेल्या बदलामुळे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार न घेता अचानक त्यात बदल केले असून त्यांच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी गावातील रणजीत खोत यांनी बंगलोरे येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थे पर्यंत भरारी घेतली आहे. तसेच तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांमधून निवड झालेला रंजीत शेतकरी कुटुंबातील आहे.

उत्तर प्रदेशच्या बारावीच्या अभ्यासक्रमात मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. असा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे पाणीप्रश्नावरून पुन्हा आंदोलन करणार आहेत .येत्या 10 एप्रिलपासून अकोला ते नागपूर पदयात्रा काढण्यात येणार आहे तर अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून या पदयात्रेला सुरूवात होणार आहे.

IPL 2023 CSK vs LSG: एमएस धोनीने सलग दोन षटकार ठोकत रचला विक्रम; विराट-रोहितच्या खास क्लमबध्ये झाला सामील

This post was last modified on %s = human-readable time difference 2:42 am

Davandi: