X

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट :- 29/3/23

Covid 19 : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात करोनाचा शिरकाव, मंत्री शंभूराज देसाई करोना पॉझिटिव्ह
मागच्या काही दिवसांमध्ये जे माझ्या संपर्कात आले त्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन शंभूराज देसाई यांनी केलं आहे.

“मी आधीच डॉक्टर झालोय, छोटीमोठी ऑपरेशन…”, डी. लीट पदवी मिळाल्यावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी
“कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही, त्याबद्दल मनात जिद्द अन्…”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी.लीट पदवी देत सन्मानित करण्यात आलं आहे.

१९८४ साली काँग्रेसच्या लाटेसमोर आपला पक्ष संपला होता, पण…”, पंतप्रधान मोदींचं विधान
“भाजपा हा जगातील नाहीतर भविष्यातील सर्वात मोठा पक्ष असेल”

▪️ येत्या 1 एप्रिलपासून पुणे मुंबई एक्सप्रेस वे मार्गावरील प्रवास महागणार, तब्बल 18 टक्के टोल वाढ करण्यात येणार

▪️ ईपीएफओने बैठकीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफवर) 2022-23 साठी 8.15 टक्के व्याजदर केला निश्चित, हाच रेट 2020-21 मध्ये 8.5 टक्के होता

▪️ केंद्र सरकार औषध कंपन्यांना अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढवण्याची परवानगी देणार, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार

▪️ स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात वक्तव्य: राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा गुन्हा दाखल करेल- रणजीत सावरकरांचा इशारा

▪️ गँगस्टर अतिकला अपहरणाप्रकरणी जन्मठेप: साबरमती तुरुंगात परत पाठवणार, अशरफसह 7 जण निर्दोष; पीडित माता म्हणाली – फाशी द्या

▪️ ‘लफडं’ शब्द घोटाळा अर्थाने वापरला, संजय शिरसाट यांचा दावा; गेली उडत आमदारकी म्हणत विरोधकांना थेट इशारा

▪️ जोर का झटका! ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद 2 वर्षांसाठी रद्द; मुंबईतल्या आंदोलनात ‘तो’ कोट घालणे भोवले

▪️ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात तपासणी केल्यानंतर अहवालातून झाले स्पष्ट

▪️ रिलायन्सचा जिओ फायबर बॅकअप प्लॅन लॉंच: फक्त 198 रुपयात ब्रॉडबॅंडसह घ्या IPL चा आनंद; महिनाभर चालेल अनलिमिटेड इंटरनेट

▪️ बॉलीवूडच्या राजकारणाला कंटाळले: प्रियंका चोप्राचा दावा; म्हणाली – मला कुणीही चित्रपटांत काम देत नव्हते, त्यामुळे हॉलिवूड गाठले

ठाकरे सरकार पाडण्यासाठी दोन वर्षांत १५० बैठका!, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आणि शिवसेनेतील आमदारांचे मत परिवर्तन करण्यासाठी राज्यात तब्बल १५० बैठका घेतल्या.

३० मार्च ते ६ एप्रिलदरम्यान ‘सावरकर गौरव यात्रा’
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस पक्षांकडून होत असलेला अपमान बघता जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंगळवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : जिल्ह्याचा सन २०२३-२४ साठी एक लाख ४७ हजार ८०० कोटी रुपयांचा वार्षिक पत पुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पीक कर्ज, कृषी मुदत कर्जासह कृषी क्षेत्रासाठी सुमारे ९७५० कोटी रुपयांची, तर सूक्ष, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सुमारे २९ हजार ६९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पत आराखडा

निवासस्थान सोडण्याच्या आदेशाचे पालन करू!, राहुल गांधींचे लोकसभा सचिवालयाला पत्र
Rahul Gandhi residence leave नियमानुसार राहुल गांधींना २२ एप्रिलपर्यंत तुघलक रोडवरील निवासस्थान सोडावे लागेल.

Rohit Sharma: ‘क्रिकेट किट घेण्यासाठी दुधाच्या पिशव्या विकायचा रोहित शर्मा’, खास मित्राने केला खुलासा
Pragyan Ojha on Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रग्यान ओझा यांची मैत्री खूप घट्ट आहे. प्रज्ञान ओझाने सांगितले की, खूप संघर्षानंतर रोहित इथपर्यंत पोहोचला आहे.

This post was last modified on March 29, 2023 2:02 am

Davandi: