सकाळच्या टॉप न्यूज अपडेट : 23 मार्च 2023

▪️ महिलांसाठी आनंदाची गुढी: खासगी ट्रॅव्हल्सकडूनही तिकीटात 50 टक्के सवलतीची घोषणा, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अंमलबजावणीही सुरू

▪️ मनसेची सभा: मला शिवसेनेत दाबण्याचा प्रयत्न झाला, मी पक्षातून कसा बाहेर जाईल यासाठी प्रयत्न झाले होते – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

▪️ नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरुमधून तरुणी ताब्यात, नागपूर पोलिसांची टीम तातडीनं बेळगावला रवाना

▪️ नववर्षा निमित्त शिर्डीतील साईबाबांच्या मंदिर कळसावर परंपरेनुसार संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्नीक विधिवत पूजन करून गुढी उभारली..!

▪️ पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका; राज्यात गेल्या तीन वर्षात 15 हजारांहून अधिक बालविवाह, राज्य सरकारची विधान परिषदेत कबुलीc

▪️ बँकांच्या सर्व शाखा 31 मार्चपर्यंत सुरू राहतील… रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकाना निर्देश, Annual closing चे आहे कारण!

▪️ आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंगची मुदत वाढवली: आता 31 मार्च 2024 पर्यंत लिंक करता येईल! तथापि, दोन्ही लिंक करणे बंधनकारक नाही

▪️ इस्रो येत्या रविवारी 26 तारखेला श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून वनवेब इंडिया-2 ही मोहीम सुरू करणार…

▪️ राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराचे वितरण: पांडवानी गायिका उषा यांनी पंतप्रधानांना नमन केले, बिरला कुटुंबात चौथ्यांदा पद्म सन्मान

▪️ IND VS AUS: मायदेशात 26 सीरीजनंतर भारत हरला; तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी विजय, कोहलीची अर्धशतकी खेळी व्यर्थ

▪️ दीड वर्षानंतरही नुकसानभरपाई नाही: ‘थलायवी’च्या वितरकाने निर्मात्यांकडून मागितले 6 कोटी, निर्मात्यांवर उठू शकतो कारवाईचा बडगा

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

tc
x