शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,मान्सून अंदमानात 3 दिवस आधीच पोहोचला; ‘या’ तारखेला महाराष्ट्रात आगमन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून अखेर अंदमानात दाखल झाला आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील नानकोवारी बेटावर मान्सून दाखल झाला आहे.

अंदमानमध्ये वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी 22 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होतो. पण यंदा मान्सूनने अंदमानच्या काही भागात तीन दिवस आधीच प्रवेश केला आहे.

मान्सून केरळमध्ये ४ जूनला दाखल होऊ शकतो. केरळमध्ये दरवर्षी १ जून रोजी पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा तीन दिवस उशीर होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 9 ते 15 जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. यंदा भारतात सरासरी ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

tc
x