शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत… विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी रेशन कार्ड धारकांना थेट आर्थिक मदत
– विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
– अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
– प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार
– कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
विदर्भ : – यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया
मराठवाडा : औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातूर
तसेच शेतकर्यांना 1 रुपया मध्ये पीक विमा भरू शकता :
– नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मिळणार
– 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ, 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
– महाराष्ट्रातील शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा, 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
– राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषि विकास अभियान राबविणार
– तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
– महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा
– मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देणार यासाठी 1000 कोटी
– अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ