शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कुणाची काय प्रतिक्रिया जाणून घ्या

Nitesh Rane : इलका पण आमचा आणि धमाका पण आमचाच; नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले
उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Rohit Pawar : चिंचवड निवडणूक ही केवळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होणार

पुणे : कसबा व चिंचवड निवडणूक या पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. यातच भाजप, राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवार अशी ही निवडणूक तिरंगी होईल असे असताना आमदार रोहित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने आता तरी..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक असून यामुळे त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीत अडचणी वाढल्या आहेत.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ‘हा’ निकाल माझ्यासाठी अतिशय धक्कादायक, अजुनही विश्वास बसत नाहीमुंबई : ‘ केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. हा निकाल माझ्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. माझा अजुनही विश्वास बसत नाही. शिवसेनेची स्थापना स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली. ते हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी कोण ? हे पक्षाने, संघटनेने आणि बाळासाहेबांनी ठरविले.’ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या पक्षाबाबतच्या निर्णयावर अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

राजू शेट्टी :- रावणाने धनुष्य उचललं, पण मतदार श्रीरामाच्या रूपात येतील…*
‘रावण धनुष्य उचलू शकला नाही. त्याचा अपमान झाला. नंतर त्याने सीता पळवली आणि रामायण घडलं. पण कलियुगातल्या रावणाने यातून बोध घेतला. त्याने पहिले रामायण घडवलं. मग सत्ता पळवली आणि मायावी शक्तीने धनुष्यही उचललं. आता मतदार श्रीरामाच्या रूपात येतील. त्या वेळीच हे रामायण पुर्ण होईल. अशी मला खात्री आहे.’ केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. या निर्णयावर अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी सोशल मिडीयावर दिली आहे.

Sanjay Raut : भारतीय जनता पार्टीच्या अंताची सुरुवात… जनता धडा शिकवेल!

पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ४० बाजारु आमदारांना घेऊन बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakeray) यांची शिवसेना संपवत आहे. रामाचा धनुष्यबाण रावणाला कसा दिला जातो. हे सर्व कौरवांच्या मदतीने भाजप करत आहे. कौरवांची संख्या जास्त असली तरी विजय हा पांडवांचा होणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली मान, प्रतिष्ठा गमावली आहे.

बाळासाहेब थोरात : – निवडणूक आयोगावर राजकीय दवाब असल्याने असा निर्णय, बाळासाहेब थोरांतांची टीकाअहमदनगर : निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. कारण, आज शिवसेना (Shiv Sena हे चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेत ते एकनाथ शिंदे आणि गटाकडे सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

Uddhav Thakeray : देशातील लोकशाही संपली… पंतप्रधानांनी हुकुमशाही घोषीत करावी!

पुणे : देशातील लोकशाही संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आता देशात हुकूमशाहीची सुरुवात झाली आहे, असे जाहीर करावे. आज केंद्रीय निवडणूक (Central Election Commission) आयोगाने शेण खाल्लं आहे. दहशत, पैशाच्या जोरावर निर्णय द्यायचा होता तर मग आम्हाला पुरावे का मागितले. आधीच निर्णय द्यायचा होता. एवढा खटाटोप करण्याची काहीच गरज नाही.

शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळताच शिंदेंच्या ट्विटरमध्ये मोठा बदल

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eletion Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. या निकलानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. आता त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हा ट्विटरचा प्रोफाईल फोटो ठेवला आहे.

tc
x