शासनाकडून गायींसाठी मिळणार ५१००० रुपये

पशुपालकांसाठी राज्य सरकारकडून एक मस्त स्पर्धा भरवण्यात येत आहे. या स्पर्धा देशी गायींसाठी असणार आहे. यामध्ये फक्त देशी गायीचं भाग घेऊ शकतात.
काय आहे स्पर्धा / योजना
ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करता असतात. यामधून त्यांना शेतीबरोबरच जास्तीचे उत्पन्न मिळत आहे. मात्र देशी गाय असणाऱ्यांसाठी शासनाने एक स्पर्धा सुरु केली आहे.

पशुपालकांसाठी स्पर्धा का ?
पशुपालकांना दुग्धव्यवसायसाठी सरकारकडून विशेष योजना सुद्धा राबवल्या जात आहेत. मध्य प्रदेश सरकारने देशी गायींचे संगोपन वाढवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत.
गोपाल पुरस्कार योजनेअंतर्गत देशी गायींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून एक स्पर्धा घेतली जात आहे.

जिंकणार कोण ?
स्पर्धेत कोणत्याही पशुपालक बांधवाची देशी गाय जास्त प्रमाणात दूध देईल तो विजयी घोषित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

स्पर्धेचे बक्षीस
पहिल्या ३ विजेत्यांसाठी वेगळी बक्षिसे देण्यात येत आहेत. प्रथम पारितोषिक ५१००० रुपये, द्वितीय पारितोषिक २१००० रुपये आणि तृतीय पारितोषिक ११००० रुपये दिले जातील.
किती दिवस सुरु राहणार ही स्पर्धा


गोपाल पुरस्कार स्पर्धा 1 फेब्रुवारी पासूनच सुरु झाली आहे जी १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेमागचा उद्देश असा आहे की पशुपालकांनी जास्तीतजास्त देशी गाई पाळाव्यात आणि त्यांचे दूध उत्पादन वाढवावे.

tc
x