विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर होत असून निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे, तर काही विजयी उमेदवारांची यादी देखील जाहीर झाली आहे.
पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी
▪️ रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाच्या अनिल नवगणे पराभव झाला.
▪️ ठाण्याच्या पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झाले आहेत.
▪️ नागपूर द. प. मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणदणीत विजय झाला आहे. तर काँग्रेसच्या प्रफुल गुडधे यांचा पराभव झाला.
▪️ पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा पराभव झाला.
▪️ जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला आहे.
▪️ सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव झाला.
▪️ मुंबईच्या वडाळा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या कालिदास कोळंबकर यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव पराभूत झाल्या आहेत.
▪️ अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचा पराभव झाला आहे.
▪️ मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांचा पराभव झाला आहे.
▪️ अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या रवी राणा यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या सुनिल खराटे यांचा पराभव झाला आहे.
▪️ पुणे जिल्ह्यातील कोथरुड मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव झाला आहे.
▪️ नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी झाले आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल कदम यांचा पराभव झाला आहे.
▪️ बीडच्या परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे.
▪️ साताऱ्यातून भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा पराभव झाला आहे.
▪️ पुण्याच्या कसबा पेठेतून भाजपच्या हेमंत रासने यांचा विजय झाला आहे, तर काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.
▪️ सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वैभव पाटील यांचा पराभव झाला आहे.
▪️ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या अमल महाडीक यांचा विजय झाला आहे, तर काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला आहे.
▪️ इस्लामपूर मतदारसंघ – विजयी उमेदवार – जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
▪️ कांदिवली पूर्व मतदारसंघ – विजयी उमेदवार – अतुल भातखळकर (भाजप)
▪️ मालेगाव बाह्य मतदारसंघ – विजयी उमेदवार – दादाजी भुसे (शिवसेना शिंदे गट)
▪️ वांद्रे पश्चिम मतदारसंघ – विजयी उमेदवार – आशिष शेलार (भाजप)
यामॅसेज मध्ये सर्व विजयी उमेदवारांची यादी पाहणे शक्य नसल्याने उर्वरित विजयी उमेदवारांची यादी आपण या मॅसेजच्या नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू.