महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी “लेक लाडकी योजना” आणली आहे. मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंत, एकूण ₹1,01,000 आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट मुलींचा जन्मदर वाढवणे, कुपोषण कमी करणे, शिक्षणासाठी प्रेरणा देणे आणि बालविवाह थांबवणे हे आहे.
योजनेचे फायदे :
मुलीच्या जीवनातील विविध टप्प्यांवर आर्थिक सहाय्य मिळते:
▪️ मुलीचा जन्म: ₹5,000
▪️ इयत्ता 1ली: ₹6,000
▪️ इयत्ता 6वी: ₹7,000
▪️ इयत्ता 11वी: ₹8,000
▪️ 18 वर्ष पूर्ण झाल्यावर: ₹75,000
🟰 एकूण रक्कम: ₹1,01,000
👉योजनेची उद्दिष्टे :
- ▪️ मुलींच्या जन्माला प्रोत्साहन: मुलींचा जन्मदर वाढवणे.
- ▪️ शिक्षणाला चालना: शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे.
- ▪️ आरोग्य सुधारणा: मुलींचा मृत्यू दर कमी करणे आणि कुपोषण रोखणे.
- ▪️ बालविवाह थांबवणे: मुलींचे शिक्षण आणि स्वावलंबन वाढवणे.
👉पात्रता आणि अटी :
▪️ रेशनकार्ड:
- पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ही योजना लागू.
▪️ जन्माची अट: - 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना ही योजना लागू.
▪️ पालकांचे उत्पन्न: - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा जास्त नसावे.
▪️ मुलींचे शिक्षण: - मुलगी संबंधित टप्प्यावर शाळेत शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.
▪️ कुटुंब नियोजन: - दुसऱ्या अपत्यासाठी लाभ घ्यायचा असल्यास, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
▪️ मुलगी अविवाहित असणे: - 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलीचा विवाह झालेला नसावा.
👉आवश्यक कागदपत्रे :
- जन्माचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला: तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा अधिकृत दाखला.
- आधार कार्ड: लाभार्थी व पालकांचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील).
- बँकेच्या पासबुकची प्रत.
- शाळेचा दाखला (Bonafide): संबंधित टप्प्यावर शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र.
- कुटुंब नियोजन प्रमाणपत्र.
- मतदान ओळखपत्र: शेवटच्या लाभासाठी मुलगी 18 वर्षांची झाल्यावर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला.
👉अर्ज कसा कराल?
▪️ अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका लाभार्थ्यांची पात्रता पडताळून ऑनलाईन अर्ज भरून देतील.
▪️ पात्र लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल.
▪️ अर्जाची खातरजमा केल्यानंतर मंजुरी दिली जाईल.
👉योजनेची सुरुवात :
- अमरावती जिल्ह्यातील 6,584 मुलींच्या खात्यात पहिला हप्ता (₹5,000 प्रत्येकी) वर्ग करण्यात आला आहे.
- 3 कोटी 17 लाख रुपयांची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे जमा झाली आहे.
- अमरावती जिल्हा योजना राबवण्यात अग्रेसर ठरला आहे.
✅महत्त्वाची माहिती :
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे बंधनकारक आहे.
- कुटुंब नियोजनाचे पालन करून योजनांचा लाभ अधिक प्रमाणात मिळेल.
तुमच्या लेकीसाठी संधी दवडू नका!
शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि आर्थिक स्थैर्य मिळवून द्या. आजच जवळच्या अंगणवाडीत जाऊन योजनेबाबत माहिती घ्या आणि अर्ज भरा!
कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल…