भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया
पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
शैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी (i) फिटर (ii) इलेक्ट्रिशियन (iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (v) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (vii) मेकॅनिक (मोटर वाहन) ( viii) वायरमन (ix) ट्रॅक्टर मेकॅनिक (x) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (xi) मेकॅनिक (डिझेल) (xii) हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.
किंवा – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पुर्ण केलेला असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १ जुलै २०२३ रोजी ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावं. OBC प्रवर्गातील ४५ आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय ४७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पगार – असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करायला सुरुवात तारीख – ७ एप्रिल २०२३
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मे २०२३
उमेदवारांची निवड – संगणक-आधारित चाचणी/लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर अॅप्टिट्युड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेतली जाईल.
सर्व तपशील योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांना सूचित केले जातील. भारतीय रेल्वे भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.