राज्यात दुष्काळाचे सावट… ‘या’ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण

WhatsApp Image 2023 09 19 at 12.50.24 AMWhatsApp Image 2023 09 19 at 12.50.24 AM

राज्यात दुष्काळाचे सावट… ‘या’ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यातील 36 पैकी 13 जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 जून ते 18 सप्टेंबर या कालावधीत 13 जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसात 20 टक्क्यांहून अधिक घट.

पुणे : राज्यातील 36 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 जून ते 18 सप्टेंबर या कालावधीत 13 जिल्ह्यांतील सरासरी पर्जन्यमान 20 टक्क्यांहून अधिक कमी झाले आहे. नगर, सांगली, सातारा, जालना, बीडमध्ये पावसात 40 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे तातडीने दुष्काळी उपाययोजना करण्याची गरज आहे.

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, 1 जून ते 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी पाऊस झाला आहे.

या कालावधीत सरासरी पाऊस 927.9 मिमी आहे, वास्तविक पाऊस 845.4 मिमी आहे. नगर, सांगली जिल्हा सरासरी 45 टक्के, सातारा सरासरी 40 टक्के, छत्रपती संभाजीनगर सरासरी 27 टक्के, जालना सरासरी 43 टक्के, नांदेड सरासरी 19 टक्के, अमरावती सरासरी 30 टक्के, वाशिम सरासरी 22 टक्के सरासरीपेक्षा कमी टक्के सोलापूर सरासरी 35 टक्के, बीड सरासरी 43 टक्के, धाराशिव सरासरी 32 टक्के, परभणी सरासरी 31 टक्के आणि अकोला सरासरी 29 टक्के कमी आहे.

हे ही वाचा :- ‘फळीवर वंदना’, ‘दास रामाचा वाट पाहे सजणा’.. गणपतीच्या आरतीत अर्थाचा अनर्थ नको; सोपा चार्ट पाहून ‘या’ ११ चुका टाळा

मराठवाड्यात 22 टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात 19 टक्के आणि विदर्भात सरासरीपेक्षा सात टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी 894.1 मिमी पाऊस अपेक्षित असताना, 827.4 मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात सरासरीपेक्षा २२ टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमान 579.3 मिमी आहे. प्रत्यक्षात 452 मिमी पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 19 टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमान 677.4 मिमी आहे, वास्तविक पाऊस 546 मिमी आहे. मात्र, कोकणात सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त, रत्नागिरीत सरासरीपेक्षा पाच टक्के कमी आणि मुंबई शहरात सरासरीपेक्षा आठ टक्के कमी पाऊस झाला आहे.

आठ जिल्ह्यांत सरासरी गाठली
राज्यातील आठ जिल्ह्यांनी पावसाची सरासरी गाठली आहे. पालघरमध्ये सरासरीच्या १९ टक्के, रायगडमध्ये ९ टक्के, मुंबई उपनगरांत २८ टक्के, ठाण्यात २५ टक्के, नांदेडमध्ये १९ टक्के, बुलडाण्यात एक टक्का, गडचिरोलीत तीन आणि यवतमाळमध्ये सरासरीपेक्षा सात टक्के जास्त पाऊस झाला आहे. सरासरीच्या १९ टक्के कमी आणि अधिक पाऊस सरासरी इतकाच गृहीत धरला जातो.

पुढील दिवस पावसाची उघडीप?
कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे निघून गेल्यामुळे आणि राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस मोसमी पाऊस राज्यात उघडीप देण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या सरी पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाचा हा खंड पाच दिवसांहून जास्त वाढल्यास टंचाईची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

This post was last modified on September 19, 2023 7:53 am

Davandi:
Related Post
whatsapp