राज्यात कुठे पाऊस, कुठे उन, वाचा.. तुमच्या गावात कसे असेल वातावरण?

नागपूर : राज्यभरात मान्सूनच्या अनुपस्थितीत काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि उष्णतेची लाट कायम आहे. मान्सूनचे पुनरागमन होत असताना उष्णतेची लाट उसळते.

मुंबई, कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज नंदुरबार, जळगाव, धुळे शहरात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा :-Weather alert: राज्यात पुढील 4, 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज जारी

सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.

tc
x