आज आपल्या देशात असे अनेक पुरुष आहे जे आपली बायको सोडून दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात आहेत .तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की लग्नाला काही वर्षे होताच पुरुषाला आपल्या पत्नीपेक्षा इतर स्त्रिया अधिक आवडू लागतात आणि त्या महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छासुद्धा पुरुषांच्या मनात निर्माण होते.आचार्य चाणक्यांनीही चाणक्य नीती या ग्रंथात पती-पत्नीच्या नातेसंबंधाची तत्त्वे सांगितली आहेत.
लहान वयात लग्न
कमी वयात लग्न करणे हे पती-पत्नीच्या नात्यासाठी चांगले नाही. तरुण वयात माणसाची समज कमी असते आणि यावेळी तो करिअर च्या बाबतीत गंभीर असतो. हा असा टप्पा आहे जेव्हा करिअरशिवाय इतर कशावरच लक्ष केंद्रित करता येत नाही आणि ते केलेही जात नाही . त्याचे लक्ष फक्त त्याच्या करिअरवर आहे. कालांतराने, जेव्हा एखाद्या टप्प्यावर स्थिरता येते आणि करिअर सुरळीत राहते, अशा वेळी व्यक्ती त्याच्या इच्छा अपेक्षा पाहतो. अशात लवकर विवाह केल्याने विवाहबाह्य संबंधांचा धोका वाढतो.
शारीरिक समाधानाचा अभाव
पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक सुख समाधान असणे खूप गरजेचे आहे. जर पती-पत्नी दोघेही शारीरिकदृष्ट्या समाधानी असतील तर त्यांचे नाते खूप चांगले असते. दोघेही त्यांच्या वैवाहिक नात्याचा खूप आनंद घेतात. पण जर दोघांमध्ये शारीरिक समाधान नसेल तर त्यांच्यात कटुता निर्माण होते. अशा स्थितीत पती-पत्नीचे विवाहबाह्य संबंध असण्याची शक्यता जास्त असते.
नात्यात विश्वास
पत्नी असताना विवाहबाह्य संबंध ठेवणे चुकीचे नाही, असे अनेक पुरुष मानतात. अशा पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वासाला खूप महत्त्व असते. दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल तर दोघेही एकमेकांशी प्रामाणिक राहतात.
आयुष्याच्या जोडीदाराचा कंटाळा
आपण पाहिले आहे की पती-पत्नी एकमेकांना कंटाळलेले असतात. अशा परिस्थितीमध्ये दोघांनाही बाहेरचा पुरुष किंवा बाहेरची स्त्री जास्त आकर्षक वाटू लागते . असे झाल्यास, पती-पत्नीच्या नातेसंबंधामध्ये नेहमीच प्रेम आणि काळजी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा कंटाळा येणार नाही.
मुलांच्या जन्मानंतर अंतर
विवाहित जोडप्यांमध्ये असेही दिसून येत की मूल जन्माला येण्याअगोदर नाते बरेच चांगले असते. जेव्हा मुलाचे आगमन होते तेव्हा त्यांच्या नात्यात कटुता येण्यास सुरू होते. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्त्रीला तिच्या पतीपेक्षा मुलांशी जास्त प्रेम आणि काळजी असते. अनेकदा पत्नी आणि मुलाच्या जन्मानंतर ती आपल्या पतीपेक्षा आपल्या मुलांना जास्त महत्त्व देऊ लागते, त्यामुळे पती पत्नीपासून दूर जातो.