याला जबाबदार कोण  आपण नाही तर कोण…..

इथे तिथे कचरा नाही त्याचा निचरा
प्लास्टिकचा कचरा  हा तर प्लास्टिकचा कचरा  रोगराई पसरते पसरतात विषाणू
आणू थोडे चिप्स अन् आणू थोडे ड्रिंक्स आजार हीच याची निशाणी
याला जबाबदार कोण  पण नाही तर कोण

नद्या झाल्या घाण भारताची शान समुद्रामध्ये आलं प्लास्टिकचे उदान  लंपि आला, फ्लू आला ,
आला आता कोरोना  कोरोना ने केली आता माणसाची दैना
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

गाव गेले आता शहरांची वस्ती 
उद्योगांच्या जाळ्यात सिमेंटची वस्ती
नदी झरा बंद झाले इथे वाहतात गटारे
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

चंदनाचा वास गेला दूर दूर
पृथ्वीवर झाला फक्त धूर धूर
माकडातून माणसाचा जन्म झाला नवा
मोबाईल वरून माणसाने फिल्टर केला नाव
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

मुलगा पाहिजे वंशाचा दिवा सासूबाई म्हणते मुलगाच हवा
त्याचा नेहमी वेगळा असतो थाट
लावतो तोच पणतीची वाट
याला जबाबदार कोण  आपण नाहीतर कोण

पृथ्वीवर जागा फक्त 29 टक्के भारताची लोकसंख्या 100% 
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण 

चंद्रावर माणूस गेला चार वेळा अजूनही पाळतात अमावस्याच्या वेळा 
जनावरांना मारून खातात नळी पानसरे दाभोळकर यांचेच बळी  याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण 


दवाखाने चार अन शाळा आहे एक
काही डॉक्टर आहेत फेक तर काही शिक्षक नेक  शाळा झाले बंद चालू झाले क्लासेस
मराठी बोलता येत नाही धरून इंग्रजीची कास शिक्षणाचा चालला सर्व बोगस प्रवास
मी नाही तू नाही तू नाही मी
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

रस्ते कमी खड्डे जास्त वय आता 100 पेक्षा 50 जास्त  24 तासात 24 ठिकाणी होतात अपघात
पाच वर्षात सरकार किती वेळा बदलतात
माणसं झाली  व्यस्त अन सरकार झाला भ्रष्ट
फास्ट फूड आले आणि जीवन झाले फास्ट
यामुळे बॉडीचा एक एक पार्ट होतो लाॅस्ट
याला जबाबदार कोण आपण  नाहीतर कोण

प्लास्टिक झाले स्वस्त आणि पृष्टी झाली नष्ट झाडे लावू झाडे वाचू हाच दिला मंत्र औद्योगीकरणात येतात नवी-नवी तंत्र शेतकरी राजा होतो झाला आता भिकारी भविष्यात आणण्यासाठी फिरू लागला दारोदारी याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण 

ऋतुमान बदलत बदलते निसर्गचक्र
क्षणात पडतो पाऊस तर क्षणात पडते ऊन
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

घर माझे गाव माझे शहर माझे राज्य माझे देश माझे जग माझे पृथ्वी माझी याला वाचवणार कोण याला वाचवणार कोण याला वाचवणार कोण आपण नाही तर कोण  आपण नाहीतर कोण 

tc
x