दिलखुलास जगा आयुष्य खूपच कमी आणि आता कमीच शिल्लक आहे उर्वरित आयुष्य स्वतःसाठी जगा. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आपण आपली आयुष्यातील 40 ते 50 वर्ष घालवली आहेत .त्यांचे खाणे पिणे करता करता तुम्ही स्वतः मात्र वेळेवर काहीच खात पित नाहीत .वेळेवर सर्वांना नाष्टा जेवण डबा देता देता शाळेची वेळ होते आणि आपण रिकाम्या पोटी शाळेत जातो किंवा ऑफिसला जातो....!!! वर्षांनवर्षं हेच चालू आहे म्हणून डायबिटीस बी पी असे अनेक आजार स्वतःहुन ओढवून घेतलेत....!!!!. म्हणून आता तरी स्वतःकडे लक्ष द्या .सकाळी 9 ला गरम गरम भाजी चपाती अथवा इतर नाष्टा पोटात गेलाच पाहिजे तेव्हा तुमचं मन आनंदित राहून तुम्ही ताजेतवाने रहाल. स्वतः ला इतकं ही कामाच्या व्यापात गुंतवू नका की बाहेर पडायला तुमचे मार्ग तुम्ही स्वतःहुन बंद करावे आणि कुढत बसावे.
केलेना आता सर्वाणसाठी मग आता स्वतःच्या मनाचा त्याच्या समाधानाचा विचार करा.चार चौघीत मिसळा , आठवड्यातून एकदा सिनेमा शॉपिंग draiving छंद वर्ग हास्यक्लब योगा अशा गोष्टीना वेळ द्या.म्हणजे आपोआप आजार दूर पळतील.
संघटना मीटिंग कार्यक्रम
वाढदिवस साखरपुडा अशा कार्यक्रमाना आवर्जून हजेरी लावा.चारचौघात गप्पा टप्पा मारल्याने तुमचे पुढचे किती तरी तास अगदी फ्रेशमूड मध्ये निघून जातील आणि आनंद मिळेल.
जुन्या मैत्रीनि सोबत महिन्यातून एकदा तरी एखादा तास घालवा मागच्या आठवणीना उजाळा मिळेल आणि प्रसन्न होऊन घरी याल त्यामुळे घर वातावरन देखील प्रसन्न होईल. वेळेवर झोपा आणि उठा आणि वेळेत नाष्टा जेवण करा शिळे खाऊ नका सांधे दुःखी त्याचाच परिणाम आहे.
फळे केवळ घरात शो ला आणून ठेऊ qनका त्याचा आस्वाद घ्यावा आरोग्य सुधारेल आणि त्वचेला तजेला येईल.
तीन महिन्यांत एकदा तरी पार्लर ला जा.
वेळ नाही वेळ नाही म्हणून स्वतःला बंदिस्त करून घेऊ नका.बिनधास्त टेंशन फ्री जगा कारण तुमचं टेंशन वाटून घ्यायला कोणीच येणार नाही आजार देखील कोणी शेयर करत नाही म्हणूनआधीपासूनच precotion is beeter than cure नुसार वागा.
मला अजून एक कळत नाही की, काही स्त्रिया घरातच बसायचे म्हणून असा स्वत:चाच अवतार का करतात..?.., मुलं नाही जवळ म्हणून शिळे पाके खातात. पौष्टिक आहाराची तुला आहे गरज. सकाळी उठल्यावर आरशात बघायचे, स्वतःकडे बघून स्मित हास्य करायचे….”किती छान दिसतेस”, म्हणून केसांतून फिरवायचा हात, तु आहे म्हणून तूझा संसार आहे छान. स्वतःच्याच पाठीवर मारायची कौतुकाची थाप…..
म्हणून म्हणते —तुम्ही आधी तुमची स्वतःला महत्व द्या, कौतुक करा, स्वतःला मान द्या. स्वतःला सर्वस्व समजा…..जेव्हा तू स्वतःवर प्रेम करशील तेव्हा तू अजून दहा वर्षे तरूण दिसशील……
मग काय ठरवलंय..
देणार ना स्वत:कडे लक्ष…..!!!
अमूल्य जीवन म्हणजे ईश्वरी वरदान आहे निसर्ग डोळ्यांत साठून घ्या भरपूर फिरा सुट्ट्या एन्जॉय करा आता मुले मोठी झालीत म्हणून तुम्ही लहान व्हा
आणि मुक्त जगाअंगावर दुखणे काढू नका वेळेत उपचार घ्या
स्वतःला जपा स्वतःकडे लक्ष द्या