भुकेलेल्या अन्न द्यावे….
तहानलेल्या ला पाणी,
जीवन जगत असतांना गात राहावीत गाणी,
कोणाबद्दल कधीच द्वेष नसावा मनी,
संसाराचा गाढा ओढताना अर्धांगिनी ला म्हणावे मी तुझा राजा,तू माझी राणी,
आपल्या दारात आलेल्या पाहुण्याला आवर्जून करावे चहा-पाणी,
सदैव निर्मळ अन मधुर ठेवावी आपली वाणी,
जीवसृष्टीच्या कल्याणकारी गोष्टीच पडाव्या आपल्या कानी,
हे ईश्वरा सर्वाना सुखी समाधानी ठेव हाच भाव असावा मनोमनी,
जीवन जगत असतांना जपावी माणुसकी मानासावणी.,
जन्म अन मृत्यू मातीतच ,म्हणून सुखदुःख झेलून आयुष्य जगावे आनंदानी…
सुनील खाडे सर