नवीन निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना मिळणार आहेत. खरं पाहता आत्तापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात होते.
या योजनेला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून 2017 पर्यंत ओळखलं जात होतं. यानंतर भाजपा शासनाने या योजनेचे नामकरण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे केलं.
‘या’ योजनेचा लाभ कोणाला?
▪️ही योजना आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी सुरू झाली आहे. राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक नागरिकांना या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत घेता येणार आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत जवळपास 1209 आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचे प्रावधान आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2 लाख पर्यंतचे उपचार मोफत केले जात होते मात्र आता सरकारने निर्णय घेतला आहे की या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत.