महत्त्वाच्या सकाळच्या न्युज अपडेट:

Karnataka Election 2023 : कर्नाटकात भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर

BMC Elections : निवडणुका लांबणीवर?, पालिका निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयात १० एप्रिलला सुनावणी
सरन्यायाधीश चंद्रचूड हे घटनापीठाच्या कामकाजात व्यस्त राहिल्याने मंगळवारी या याचिकांवर सुनावणी झाली नाही.

करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा!, जिल्हा प्रशासन, महापालिकांना आरोग्य विभागाच्या सूचना
Corona Virus Spread in Mumbai देशामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना केंद्र सरकारने दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तातडीने आढावा बैठक घेण्यात आली.

भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांचे निधन
Girish Bapat Death गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या बापट यांचे बुधवारी दुपारी निधन झाले.

पाकिस्तानात पीठ वाटपावेळी चेंगराचेंगरी, दोन दिवसांत ११ ठार
पाकिस्तान सरकारने गरीबांना गव्हाचे पीठ मोफत देण्याची योजना आणल्यानंतर वितरण केंद्रांवर चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत.

नाशिक: एचएएल कंपनीस सहा हजारहून अधिक कोटींचा निधी मंजूर, एचटीटी ४० प्रकारातील ६० विमान निर्मितीचे काम
ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीला विमान निर्मितीसाठी सहा हजार ८२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

गिरीश बापट यांचं निधन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वाहिली आदरांजली!

Karuna Sharma : “कायद्यानुसार मी कोट्यवधींची मालकीण..” धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप
काही वेळापूर्वीच करूणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले आहेत

अत्यावश्यक औषधांची १ एप्रिलपासून दरवाढ, ३८४ औषधांच्या किमतीत ११ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता
वेदनाशामक, संसर्गविरोधी, हृदयविकारावरील औषधे, प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स) किमती १ एप्रिलपासून वाढणार आहेत.

IPL 2023: अखेर प्रतिक्षा संपली! चेन्नई सुपर किंग्जने लॉन्च केली नवी जर्सी; धोनी, अजिंक्य रहाणेसह सर्व खेळाडू होते उपस्थित

▪️ आता UPI व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क: 1 एप्रिलपासून गुगल-पे, फोन-पे वरून पेमेंट करणे होणार महाग, 2 हजारांपेक्षा जास्त रकमेवर 1.1% चार्ज

▪️ SEBI: स्टॉक ब्रोकर्सकडून होणाऱ्या फसवणुकीवर आता नियंत्रण येणार, औपचारिक यंत्रणा निर्माण करण्याची SEBIची घोषणा

▪️ निवडणुकीचा बिगुल! कर्नाटकात 10 मे रोजी मतदान, निकाल 13 मे रोजी; वायनाड पोटनिवडणुकीबाबत आयोग म्हणाले- 6 महिने आहे, बघू

▪️ आपच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा यांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा, ॲट्रॉसिटी अंतर्गत सुरु असलेल्या कारवाईला चार आठवड्यांसाठी स्थगिती

▪️ सायबर क्राईम: पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने IPS अधिकाऱ्यांना गंडा, आरोपींनी मदतीची पोस्ट केली व्हायरल

▪️ खासदारकी पुन्हा बहाल: लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पुन्हा संसद सदस्य, न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर झाले होते रद्द

▪️ झुंज संपली! खासदार गिरीश बापट अनंतात विलीन; ते 73 वर्षांचे होते, पुणेकरांनी साश्रु नयनांनी दिला अखेरचा निरोप

▪️ पदवीवरून निशाणा: एकनाथ शिंदेंना डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठाचीच चौकशी व्हायला पाहिजे, संजय राऊतांनी काढला चिमटा

▪️ आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल! अर्जेंटीनाच्या मेस्सीची 102 गोलसह दुसऱ्या तर भारताचा सुनील छेत्रीची 85 गोलसह 5व्या स्थानावर धडक

▪️ आयपीएल 2023: दुखापतीमुळे जेतेपदाच्या समीकरणात माेठा बदल! 13 खेळाडूंनी घेतली माघार, दुखापतीचा आयपीएलला फटका

▪️ महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या 19 वर्षीय तरुणाचा अखेर मृत्यू

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

tc
x