मित्रांनो, मकरसंक्रात हा सण जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या 14 व्या किंवा 15 व्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो.
एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व आहे.या दिवशी सर्व मित्रमंडळी, लहान मुले हे तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वडया वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ अशा शुभेच्छा देतात.
मकरसंक्रांत मुहूर्त 2023 | Makarsankrant’s Time & Date 2023
मकरसंक्रांती तारीख – १५ जानेवारी २०२३, रविवार .
मकरसंक्रांती शुभमुहूर्त – सकाळी ०७:३६ ते संध्याकाळी ०६:३१ .
कालावधी – १० तास ५५ मि.
मकरसंक्रांती महापुण्यकाळ – सकाळी ०७:३६ ते सकाळी ९: २५ .
कालावधी – ०१ तास ४९ मि.
मकर संक्रांति माहिती मराठी – (makar sankranti mahiti marathi)
आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचं आपण पाहातो. या पंरंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पुर्वजांचा एक चांगला हेतु असल्याचे लक्षात येते. गुढीपाडवा, दिपावली, दसरा, गणेशचतुर्थी, नवरात्र, यांसारखाच आणखीन एक महत्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकरसंक्रांत!!!
मकरसंक्रात सणापुर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सुर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते. आणि हा सुर्यदेव तापायलाच तयार नसतो! तो तयार होतो ते या मकरसंक्राती पासुन!
मकरसंक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे हा सण कायम १४ जानेवारीलाच येतो (कधीतरी या सणाला १३जानेवारी किंवा १५ जानेवारीला आल्याचे आपण पाहातो पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी १४ जानेवारीला येतो) पौष महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे.
शेतीशी आणि सौरकालगणनेशी संबंध – (makar sankranti)
हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधीत अतिशय महत्वाचा सण असुन शेतीशी देखील संबंधीत आहे. मकरसंक्रांतीपासुन हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सुर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते (मकरसंक्रांतीपासुन ते रथसप्तमी पर्यंत अनेक सुवासिनी हळदीकुंकवाचे आयोजन करतात.)
असं म्हणतात की या रथसप्तमीपासुन सुर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात.
मकरसंक्रांतीचे आहारदृष्टया महत्व – (makar sankranti significance)
मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकिंना सुगडयाचे वाण देतात या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहातो. (हरभरे, मटर, बोरं, गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पहायला मिळतो) ऊस, हरभरे, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगडयात भरून हे वाण महिला वर्ग ज्यापध्दतीने एकमेकिंना देतं त्याचप्रमाणे पंढरपुरच्या रूक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्यादिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करतांना दिसुन येतात.
महाराष्ट्रातील मकरसंक्रांत हा सन कसा साजरा करतात? – (makar sankranti maharashtra)
मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची, एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं कां! तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पुर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी.
मकरसंक्रांती आणि पतंग – (makar sankranti and kite)
सुवासिनी या दिवसांमध्ये
हळदीकुंकवाचे आयोजन करतात हे तर समजले पण बालगोपाळांचे काय ? तर मंडळी बालगोपाळ तल्लीन असतात आपल्या मोठया भावाबरोबर, मित्रमंडळींबरोबर वडीलधा.या माणसांसोबत पंतग उडविण्यात. भरपुर ठिकाणी पंतग मोहोत्सव देखील आयोजित केल्या जातो. . . पतंग बनविण्याचे देखील शिकविण्यात येते. पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहाण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरात ला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते.
या पतंग उडविण्याचे शास्त्रीय कारण
पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सुर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता पतंगी पेक्षा चांगले कारण कोणतेही असु शकत नाही. आणि म्हणुनच मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली असावी
This post was last modified on %s = human-readable time difference 9:43 am