केंद्र सरकारने २३ फेब्रुवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांचे वय निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे
नवीन शिक्षण धोरणानुसार शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळाच्या प्रवेशासाठी नवीन नियम लागू केला आहे
पहा कसे आहेत नवे नियम
तुम्हाला माहिती असेल, गुजरात, तेलंगणा, लडाख, आसाम आणि पुद्दुचेरी ही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे 5 वर्षांच्या मुलांनाही पहिल्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. मात्र आता सरकारने नवीन नियम लागू केला आहे.
त्यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. सहा वर्ष पूर्ण नसल्यास विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही.
शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे हे शिकण्यासाठीचा मुलभूत टप्पा आहे.
त्यामुळे बालकांची ६ वर्षे पूर्ण असतील तरच त्यांना शाळेत प्रवेश मिळणार , असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
बालकांची ६ वर्षे पूर्ण असतील तरच शाळेत प्रवेश मिळणार – ही बातमी प्रत्येक पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.