बदलणार भारताचे दिवस
खुशबू फिर से फैल उठेगी , हिंदुस्तानी माटी में|
फूल खिलेंगे मुस्कायेंगे अब कश्मीरी घाटी में||
या ओळींप्रमाणेच आता जम्मू काश्मीर मुळे जणू भारताचे दिवसच बदलणार आहेत. जम्मू आणि काश्मीरला दहशतवादाचा कायम धोका असला तरी हे भारताचं शिखर आहे.आपल्या भारतीय सुरक्षा दलांनी नेहमी दहशतवाद्यांना अद्दल घडवलीआहे .आणि आता अशातच जम्मूमध्ये भारताच्या हाती मोठा खजिना लागला आहे. या खजिन्यामुळे संपूर्ण भारताचं नशिब पालटणार आहे. यामुळे भारतात मोठा पैसा येईल आणि अर्थव्यवस्था वाढण्यासाठी याची मदत होईल.
लिथियम चा साठा :
जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. यामुळे वाहतूक उद्योगाला मोठी चालना मिळेल.
लिथियम कुठे वापरतात :
• लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे, त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरीमध्ये केला जातो.
• लिथियमचे अनेक औद्योगिक फायदेही आहेत. यामुळे उष्णता-प्रतिरोधक काच, सिरॅमिक्स, ग्रीस स्नेहक, लोह, पोलाद आणि अॅल्युमिनियमच्या उत्पादनासाठी उपयोग होतो.
• फ्लक्स अॅडिटीव्ह, लिथियम धातूच्या बॅटरी आणि लिथियम-आयन बॅटरी बनवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे.
• सगळ्यातजास्त म्हणजे रिचार्ज करणाऱ्या बॅटऱ्यांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आहे लिथियमचे फायदे :
• लिथियमचा आरोग्यासाठी फायदा म्हणजे उन्माद, मूड स्विंगची तीव्रता आणि गंभीरता कमी करण्यासाठी हे फायद्याचं आहे.
• यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते.
• आत्महत्या करण्याचे विचार वारंवार येत असतील तर त्याच्या भावना कमी करण्यासाठी लिथियमचा वापर चांगला आहे.
• त्यामुळे भविष्यात याचा मानसिक तणाव कमी करण्यास मोठा फायदा होईल.
लिथियम बरोबरच हे पण सापडले :
• भारतातल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जम्मूच्या सलाल-हिमाना या भागात हा खजिना सापडला आहे. इथे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहेत.
• यापैकी ५ ब्लॉक्स लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे आहेत.
• हा खजिना शोधण्यासाठी २०१८-१९ ला सुरुवात करण्यात आली होती.
• १७ ब्लॉक हे कोळश्याच्या साठ्याचे असल्याचंही सांगण्यात येत आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 9:51 am