तुमचा फोन कधी पाण्यात पडला का? आपल्यापैकी बऱ्याच लोकांसोबत असं घडतं.
आता पावसाळा चालू होणार तर आपला मोबाईल असा सांभाळा
या स्टेप्स फॉलो करा….
तुमचा फोन कधी पाण्यात पडला का? आपल्यापैकी बऱ्याच लोकांसोबत असं घडतं. फोन पाण्यात पडल्यावर आपण फोन सुधारण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतो, पण आज आपण काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.
स्टेप १
जर तुमचा फोन पाण्यात पडला असेल तर शक्य होईल तितक्या लवकर पाण्यातून बाहेर काढा. काही स्मार्टफोनमध्ये वॉटरप्रूफ कोटिंग असते, जे फोनला पाण्यापासून सुरक्षित ठेवते पण जास्त वेळ फोन पाण्यात असेल तर कधी कधी वॉटरप्रूफ कोटिंगही निरुपयोगी ठरते.
स्टेप २
फोन पाण्यातून बाहेर काढल्यानंतर लगेच स्विच ऑफ करा. फोन स्विच ऑफ केल्याने फोनच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचे शॉर्ट सर्किट होण्यापासून मदत होते.
स्टेप ३
फोन स्विच ऑफ केल्यानंतर फोनची बॅटरी, सीम कार्ड, मेमरी कार्ड, फोन कव्हर बाजूला काढा आणि कपड्याने फोन चांगला पुसा.
स्टेप ४
जर फोनमध्ये पाणी असेल तर फोन चांगला शेक करा. जर हेडफोन जॅक, चार्जिंग पोर्ट आणि फोनच्या बटण्समध्ये पाणी असेल तर शेक केल्यामुळे बाहेर पडेल. त्यानंतर पुन्हा कोरड्या कपड्याने किंवा टॉयलेट पेपरने फोन चांगला पुसून घ्या.
हेही वाचा : Smart Phone : कोणता स्मार्टफोन किती वर्षे वापरता येईल?
स्टेप ५
त्यानंतर फोन तांदळाच्या बंद पोत्यात किंवा डब्यात ठेवा. जवळपास २४ ते ४८ तास फोन तांदळात ठेवा.
स्टेप ६
जर तुमच्या फोनमध्ये जास्त पाणी गेले नसेल तर फोन सुरू होईल. जर फोन सुरू झाला नसेल तर फोन सर्व्हिस सेन्टरमध्ये जा आणि फोन दुरुस्ती करण्यासाठी द्या.
आता पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे फोनची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला पावसाळ्यात फोन पाण्यापासून सुरक्षित ठेवायचा असेल तर वॉटरप्रूफ कव्हर वापरा!