पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात
मुंबई : राज्यात आजपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली.
राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, आजपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे.
सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करत आहेत.
विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भरती प्रक्रिया अचूक आणि पारदर्शीपणे व्हावी यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात असल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे.
2 ते 4 जानेवारी : पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी
5 जानेवारी : महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार
6 ते 14 जानेवारी : पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार
15 ते 17 जानेवारी : पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार
उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती
आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती,
सर्व मूळ कागदपत्रे
सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच
अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो)
आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र