पहिलं प्रेम

रोज क्लासला येतांच
माझे डोळे तिला शोधायचे
नजरेला नजर भिडायची तेव्हा
हृदय माझे धक धक व्हायचे ||१||

आठवते , सुट्टी होताच कॉलेजला
तिचे ते इशाऱ्याने बोलावणे
हातात हात घेऊन एकमेकांचा
कॅन्टीन वरती चहा पिणे ||२||

तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहून
माझं हृदय घायाळ होऊन जायचं
तिच्या पैंजणाचा आवाज येतांच
मन अगदी चल बिचल व्हायचं ||३||

कॉलेजच्या कॅन्टीन मधून
आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती
मी तर एका मैत्रिणीच्या शोधात होतो
पण मला माझी प्रेयसी मिळाली होती ||४||

पहिले तीला स्वप्नामध्ये पाहायचो
आज माझ्यासोबत ती आहे
आज अशक्य काहीचं वाटत नाही
कारण माझ्या ध्येयाचा भागीदार , ती आहे ||५||

आयुष्यात खूप व्यक्ती येतात
पण प्रत्येकात मन रमत नाही
माझ्यासोबत नसते जेव्हा ती
तेव्हा तिच्या वाचून करमत नाही ||६||

कवी स्वप्निल गोरे (प्रेमी रचनाकार)
पत्ता सावरगाव गोरे
तालुका पुसद
जिल्हा यवतमाळ

Leave a Comment

tc
x