पती-पत्नीने रोज करा हे काम, कधीच येणार नाही दुरावा; पहा चाणक्य काय सांगतात…
चाणक्यनीती या ग्रंथात आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा स्त्री आणि पुरुषांना मोठा फायदा होत आहे.
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती या ग्रंथामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच आजही वैवाहिक जीवनातील स्त्री आणि पुरुषांना फायदा होत आहे. मात्र सुखी संसारासाठी काही धोरणे सांगितली आहेत त्याचे पालन नेहमी करावे.
चाणक्यनीतीमध्ये सुखी संसार ठेवण्यासाठी अनेक धोरणे सांगण्यात आली आहेत. जर ती धोरणे अवलंबली तर स्त्री आणि पुरुषांच्या नात्यांमध्ये कधीच दुरावा येत नाही. वैवाहिक जीवन नेहमी सुखी राहते.
चाणक्यांनी वैवाहिक जीवनात सुखी राहण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. त्याचा उपयोग करून स्त्री आणि पुरुष सुखी संसार थाटामाटात जगू शकतात.
पती-पत्नीने नेहमी एकमेकांचा आदर करावा
स्त्री आणि पुरुषाने नेहमी एकमेकांचा आदर करावा. एकमेकांचा आदर केल्याने प्रेमात वाढ होते. तसेच नातेही घट्ट बनते. त्यामुळे नेहमी एकमेकांचा आदर करावा.
काही गोष्टी कोणालाही सांगू नये.
पती-पत्नीमध्ये अशा काही गोष्टी असतात त्या कधीही कोणाला सांगू नये. जर तुम्ही काही खाजगी गोष्टी इतरांना शेअर केल्या तर नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. एकमेकांचा विश्वास कमी होईल. त्यामुळे चुकूनही हे करू नये.
कधीही गर्व करू नका
पती-पत्नीला संसार चालवण्यासाठी एकमेकांना समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. दोघांपैकी कधीही कोणीही गर्व करू नये अन्यथा नात्यामध्ये कटुता निर्माण होईल. पती किंवा पत्नी इतरांसमोर उद्धटपणे वागले तर त्याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो.
This post was last modified on January 17, 2023 12:11 pm