देशात आयुर्वेदिक उत्पादनात पतंजली हे मोठे नाव आहे. बाजारात पतंजलीने कायम अनेक उत्पादने आणली आहेत. ग्राहकांचाही याला उत्तम प्रतिसाद आहे.
जर तुम्ही सुद्धा पतंजलीचे उत्पादने वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आयुर्वेदिक उत्पादनात नाव असलेली पतंजली कंपनी बाजारात अनेक उत्पादने आणणार आहे.सध्या मिळालेल्या माहितीनुसार पतंजली फूड्स पुढील दोन तिमाहींमध्ये कुकीज, व्हिटॅमिन गमी आणि बाजरी आधारित खाद्यपदार्थांसारखी उच्चतम प्रीमियम उत्पादने लवकरच बाजारात आणणार आहेत . पतंजली फूड्सचे मुख्य कार्यकारी संजीव अस्थाना यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.
पतंजली फूड्सचे मुख्य कार्यकारी संजीव अस्थाना यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिलेली आहे. पतंजली फूड्स येणाऱ्या दोन तिमाहींत कुकीज, व्हिटॅमिन गमी आणि बाजरी आधारित खाद्यपदार्थ यांसारखी उच्च प्रीमियम उत्पादने बाजारात आणणार आहे.
कंपनी फेब्रुवारी-मार्चमध्ये काही उत्पादने लाँच करणार
पतंजली फूड्सचे सीईओ संजीव अस्थाना एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की , “काही लाँच फेब्रुवारी-मार्चमध्ये होतील. त्याच वेळी, पुढील तिमाहीत काही लॉन्च होतील. प्रीमियम श्रेणीत प्रवेश करण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे, त्याद्वारे आमचे मार्जिन सुधारणे आणि ग्राहकांना निवडण्यासाठी उत्पादनांची विस्तृत कॅटेगरी देणे.ते बोलले की, तुम्ही प्रीमियम श्रेणीत नसल्यास, बिस्किटे मार्जिन कमी देतात. तसेच, बिस्किट मार्केटच्या खालच्या भागात किंमतीचा खूप दबाव आहे. FMCG कंपन्या गेल्या दोन वर्षांपासून कच्च्या मालाच्या चढ्या किमतीं बरोबर झुंज देत आहेत.
पतंजली फूड्सचे शेअर्सवर नजर टाका
या वर्षी पतंजली फूड्सचे शेअर्स आतापर्यंत २० टक्क्यांनी घसरले आहेत. BSE येथे २ जानेवारी २०२३ रोजी पतंजली फूड्सचे शेअर्स ११९३.४० रुपयांच्या पातळीवर होते. BSE येथे १० फेब्रुवारी २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स रु.९५५ वर बंद झाले आहेत. पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये गेल्या ६ महिन्यांत सुमारे १५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चतम पातळी १४९५ रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या समभागांची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८६५.८५ रुपये आहे.