X

नरेंद्र मोदी : मी पुन्हा येणार!; २०२४ मध्ये आपणच पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात नेमका काय विश्वास व्यक्त केला? जाणून घ्या

संबोधित केलं. १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशाला त्यांचं हे दहावं संबोधन होतं. बिगर काँग्रेसी पंतप्रधानांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग दहावेळा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. तसंच काँग्रेसवर कडाडून टीका ही केली. भ्रष्टाचाराच्या राक्षसाने आपला विळखा देशाभोवती घातला होता आणि देशाला घट्ट पकडून ठेवलं होतं असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

तर दुसरीकडे पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्येही आपणच लाल किल्ल्यावरुन भाषण करु असा विश्वासही व्यक्त केला.

हे ही वाचा : – Job Udate : १० वी पास उमेदवारांना खुशखबर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !पदासाठी भरती सुरु

काय म्हणाले आहेत नरेंद्र मोदी?
“२०१४ मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवलं. २०१९ मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला.

आता २०२४ साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. कारण सगळे भारतीय हे माझं कुटुंब आहेत.

मी तुमचं दुःख सहन करु शकत नाही.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढच्या टर्ममध्येही आपणच पंतप्रधान असू हा विश्वास व्यक्त केला.

मणिपूरवरही भाष्य
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचाही उल्लेख केला. मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. देश मणिपूरच्या पाठिशी आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा : – weather update : पावसाचा जोर वाढणार! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ‘इन’ तारखांना कमाल पावसाचा अंदाज;पावसाच्या अंदाजावर लक्ष ठेवा

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशातील तरुणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते.आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे.

This post was last modified on August 15, 2023 1:21 pm

Davandi: