देश तसा चांगला….
★ मतपेटी ‘रिकामी’ असूनही लोकप्रिय असावं राज ठाकरे सारखं !
★ तोंडुन निघालेल्या प्रत्येक शब्दावर ठाम रहावं बाळासाहेब ठाकरें सारखं….
★ लोकांच्या अपेक्षा उंच कराव्या नरेंद्र मोदीं सारख्या…
★ ३५ वर्षात जे कमावलं ते ‘एका’ वर्षात गमवावं नारायण राणे सारखं!
★ मैत्रीच्या नावाखाली धंदा करावा बराक ओबामा सारखा..! ★ भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द न होणे असे चरित्र असावे शरद पवार सारखे.!
★ विद्वान असुनही मस्करीचा विषय बनावं मनमोहन सिंह सारखं.!
★ एकनिष्ठपणे पाठीशी उभं रहावं बाळा नांदगावकर सारखं…..!
★ अपयशाने न खचता ध्येया पाई आयुष्य वेचावं दलाई लामा सारखं.!
★ बाॅलीवुड मध्ये मराठीपण जपावं नाना पाटेकर सारखं…!
★ कर्मयेागी आणि निस्सिम समाजसेवा करावी आमटे कुटुंबा सारखी..!
★ कवितेचा अपमानच नाहीतर विनयभंग करु नये रामदास आठवले सारखा.!
★ फक्त उत्क्रृष्टतेचाच ध्यास असावा गुलझार सारखा….!
★ हजरजबाबी असावं कपिल शर्मा सारखं…!
★ आयुष्यभर साडेसाती नसावी संजय दत्त सारखी…!
★ ७५ व्या वर्षी ‘मागणी’ आणि ‘busy’ असावं अमिताभ बच्चन सारखं.
★ ४० व्या वर्षी निवृत्त व्हावं सचिन तेंडुलकर सारखं……!
★ सोन्याची अंडी देणारी कोंबडी असावी IPL सारखी…!
★ ‘कात’ टाकावी मराठी सिनेमा सारखी…..!
★ वर्षानुवर्ष एकच चव टिकवावी चितळे आणि मामलेदार सारखी.!
★ वाचनाची आवड व सहनशीलता हवी तुमच्या सारखी.!
★ Forward करण्याची हौस असावी माझ्या सारखी.
हे ही वाचा :- Stay Healthy for a Hundred Years निरोगी राहा शंभर वर्ष,जीवनोपयोगी,अति महत्वाची माहिती
देश तसा चांगला, पण आपणच त्याला उल्टा टांगला.”
१. बदलत्या काळानुसार प्रत्येक आईवडीलांनी ही गोष्ट समजून घ्यावी की, मुलांना पराठे आणि मुलीला कराटे येणे गरजेचे आहे.
२. भारतातीले लोक हेलमेट घालणार नाहीत, पण मोबाईलला स्क्रीनगार्ड नक्की लावणार. म्हणजे डोकं फुटून रक्त वाहत गेलं तरी चालेल, पण मोबाईल स्क्रीनला स्क्रॅच नाही आला पाहिजे.
३ मला देशाच्या गरिबीविषयी तेव्हा माहित झाले, जेव्हा कोणीतरी माझ्या बाईकचा कपडा गायब केला.
४. सध्या शाळेत सुरू असलेल्या उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांच्या आधी झेरॉक्स वाल्यांना असते.
५. आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो. अन् हे लोक ३ रूपयांचे पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.
”थोडेसे मजेदार वाटले म्हणून पाठवले पण.. तरी खरी वास्तवता आहे बरं ही”👍🏻🌹🙏
इतरांना पण नक्की आवडले. शेअर करा